टीम मंगळवेढा टाईम्स ।
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
बारावीच्या परिक्षामुळे ते आंदोलन आज दुपारी १२ वाजता करण्यात येईल. पोलिसांनी आंदोलन करू दिलं नाही, तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
शेतकऱ्यांचे विजेचे बिल दुरुस्त करून द्यावे, विज वितरण कार्यालयाने शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी यासह वेगवेगळ्या प्रश्नांवर हे आंदोलन होणार आहे.
वीज दरामध्ये करण्यात येणारी ३७ टक्के दरवाढ आम्हाला मान्य नाही. फक्त पाच जिल्ह्यांमध्ये दिवसा वीज दिली आहे, ती संपूर्ण महाराष्ट्रात द्यावी, अशी मागणीही शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेट्टी म्हणाले की, रात्री वीज दिल्यामुळे जंगली जनावरे आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष होतो, त्यात शेतकऱ्यांचा बळी जातो. शेतकऱ्याने वापरलेली वीज, यातील ५० टक्केच शेतकरी वापरतात,
बाकीच्या चोऱ्या आणि लॉसेस शेतकऱ्यांच्या नावाने हॉर्स पावरच्या नावाखाली खपवतात. सोलापूरसह सातारा, कराड, खटाव, फलटण या प्रमुख ठिकाणी चक्का जाम करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा यासह अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन होणार आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेले नाही. पिक विमा देत असताना विमा कंपन्या शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. सूरत-चेन्नई राष्ट्रीय महत्वकांक्षी महामार्ग होणार आहे.
पण, शेतकऱ्यांना अंधारात ठेवून, त्यांना किती मोबदला द्यावा लागणार याची माहिती दिली गेली नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने मोजणे, त्यावर हद्दी फिक्स करणे, अशा पद्धतीचे काम महसूल, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने होत आहे. ते काम आम्ही बंद पाडले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर सूरत चेन्नई राष्ट्रीय महत्वकांक्षी महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज