टीम मंगळवेढा टाईम्स।
गत हंगामात आपण सर्वांचे सहकार्याने कारखान्याने ३ लाख ८० हजार ५३५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३ लाख ८४ हजार ३०० क्विंटल पोती साखरेचे उत्पादन केले असून, १० टक्के साखर उतारा मिळाला आहे. येणाऱ्या हंगामात इतर कारखान्याप्रमाणे बिल देणार असून
कारखान्याकडे कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना, आर्थिक अडचणी असताना एफआरपी रुपये २३२५ असुन सुद्धा स्पर्धेत टिकून जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्यासाठी झालेल्या गळीत हंगामात गळितास आलेल्या उसाला २७०९ रुपये दर दिला आहे.
येत्या हंगामात ५ लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट असून, दोन वर्षात १० हजारपेक्षा जास्त नवीन सभासदत्व देणारा संत, दामाजी हा महाराष्ट्रातील एकमेव साखर कारखाना आहे, असे मत चेअरमन शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले.
ते कारखान्याच्या २०२३-२४ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी दुपारी कारखाना कार्यस्थळावर बोलत होते.
सभेच्या सुरुवातीला प्रतिमांचे पूजन प्रा.शिवाजीराव काळुंगे व माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी व्हाइस चेअरमन तानाजी खरात, संचालक संचालक मंडळ आदी उपस्थित होते. त्यानंतर दिवंगत सभासद, शेतकरी, कामगार साहित्यिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
तोडणीसाठी आवश्यक मटेरिअल मागवून ऑफ सिझनमधील मशिनरी दुरुस्तीचीकामे पुर्ण करून घेत आहेत. पूर्ण क्षमतेने कारखाना चालवण्यासाठी आवश्यक असणारी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा बैलगाडी २२०, डंपिंग ट्रॅक्टर १७५, ट्रॅक्टर १६५ व हार्वेस्टर मशिन १० भरती करुन त्यांना रु.१३ कोटी ४७ लाख अॅडव्हान्स दिलेला आहे.
चरणूकाका पाटील यांचा पुतळा उभारणार
कारखान्याचे संस्थापक कि.रा.मर्दा व रतनचंद शहा यांच्याबरोबर चरणूकाका पाटील यांचेही मोठे योगदान असून, त्यांचा कारखाना साइटवर पुतळा उभारण्याबाबत ठराव मांडला. याला कारखान्याचे व्हाइस चेअरमन तानाजी खरात यांनी अनुमोदन दिले. चेअरमन शिवानंद पाटील यांनी लवकरात लवकर पुतळा उभारणार असलेचे जाहीर केले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज