mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मरवडे येथे शंभूराजे बलिदान दिन साजरा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 12, 2021
in मंगळवेढा
वायरमनला अतिरिक्त कामाचा बोजा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित

टीम मंगळवेढा टाईम्स। 

साफल्यपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा शिवचरित्रातून मिळत असली तरी देव देश अन धर्मासाठी बलिदान देऊन छ.संभाजीराजे स्वराज्याच्या इतिहासात अजरामर झाले असे प्रतिपादन छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांनी केले.

मरवडे येथे छत्रपती संभाजीराजे बलिदान दिनाचेनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पवार यांनी आमचं रक्त सांडून जर स्वराज्याचे स्वधर्माचे रक्षण होणार असेल तर केवळ या मातीत रक्त सांडण्यासाठी जन्म घेऊ असं अभिमानाने सांगणाऱ्या पिढ्या शिवरायांच्या पश्चात इथे निर्माण झाल्या.

अशा झुंजार वृत्तीच्या मावळ्यांनीच औरंगजेबाचे आक्रमण परतवून लावले. छत्रपती संभाजीराजांच्या हौतात्म्याने मराठी माणसाला प्रेरणा दिली , इथल्या गवताला भाले फुटले , मनगटांची पोलादी कडी झाली आणि मुघलांना विजय दुरापास्त झाला.

यावेळी पवार यांनी महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सवंगड्यांनी नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या सेनासागरात दिलेल्या प्राणाहुतीचा इतिहास सांगून स्वराज्यासाठी सर्वस्वाची होळी करणाऱ्या मावळ्यांनी स्वातंत्र्याची अमरगाथा रचल्याचे अभिमानपूर्वक सांगितले.

प्रारंभी माजी सभापती भारत मासाळ सर व मारुती जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करुन आरती करण्यात आली त्याबरोबरच भगव्या ध्वजाच्या नेतृत्वाखाली मुख्य रस्त्यावरुन मूक पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याचे पूजन कुंडलिक गणपाटील, बापूराव जाधव ,अनुप सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. ध्येयमंत्राचे पठण निखिल कुलकर्णी यांनी तर प्रेरणामंत्राचे पठण पराग रोंगे यांनी केले.

सूत्रसंचलन अजिंक्य माने यांनी केले तर आभार गणेश जगताप यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय घुले, विजय पवार , समाधान ऐवळे, दत्तात्रय मासाळ , सुनिल शिंदे , बाळासाहेब कदम , अमीर मणेरी, दिलीप गायकवाड , प्रकाश बनसोडे , दादासाहेब भगरे , सचिन सरडे यांनी परिश्रम घेतले . यावेळी गावातील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मरवडे

संबंधित बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

March 10, 2026
मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

March 8, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! आज एमपीएससी परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..