टीम मंगळवेढा टाईम्स।
कोणतीही जयंती साजरी करताना डॉल्बी व शोभा यात्रा यावर जोर देण्यापेक्षा महापुरूषांचे विचार आत्मसात करून जयंती साजरी करावी असे आवाहन अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती, रमजान ईद आदि सणांच्या पार्श्वभुमीवर मंगळवेढा पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर पोलिस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक बापुसाहेब पिंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक सलिम शेख आदि उपस्थित होते.
यावेळी हिम्मतराव जाधव म्हणाले, जयंती साजरी करताना सर्वांनी एकच दिवस, एकच शोभा यात्रा व एकच मार्ग हा विचार अवलंबला पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेला कायदा पाळायचा असेल तर विचारांची जयंती साजरी झाली पाहिजे.
वाचाल तर वाचाल याप्रमाणे वाचन चळवळ जोपासावी. वैचारिक मतभेद वैचारिक स्तरावर रहावेत. सोशल मिडिया व डिजीटलच्या माध्यमातून भावना व्यक्त करताना उन्माद नको, आदर हवा. पोस्टर बॅनर लावताना रितसर परवानगी घ्यावी.
कार्यकर्त्यांपेक्षा महामानवांचे फोटो बॅनरवरती असावेत. सोशल मिडियाचा वापर करताना कोणत्याही धर्मात व जातीत तेढ होणार नाही याची काळजी घ्यावी.
सायबर क्राईम ब्रँच लक्ष ठेवून आहे त्यामुळे सोशल मिडियाचा वापर जपून करावा.
जो नियम शिवजयंतीला तोच नियम डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला, जो नियम गणपतीला तोच नियम ईद-ए-मिलाद ला असून सर्वांनी कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे.
मंडप टाकताना त्या मंडपाचा त्रास कोणालाही होणार नाही याची काळजी घ्या. मोटारसायकल रॅली काढण्यापेक्षा सायकलची रॅली काढून चांगला संदेश द्या. गरजूंना मदत करून सामाजिक उपक्रम राबवा.
तळीरामाना मिरवणुकीत प्रवेश देवू नका. सर्वांपुढे आर्थिक संकट असल्याने वर्गणीची सक्ती करू नका. ग्रामीण भागात पुतळे उभारणे, झेंडे लावणे यावरून तणाव वाढतो. पोलिस पाटलांनी याबाबत सतर्क रहावे. शासनाने दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी तत्पर असावे.।
पोलिस पाटील या पदाचा मान राखावा व पदाला न्याय द्यावा. निःपक्षपातीपणे काम करावे. त्यांनी सतर्क राहून काम केल्यास पोलिस यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास मदत होईल.
पो.नि.रणजित माने म्हणाले, मंगळवेढयात हिंदू मुस्लिम ऐक्य आहेच परंतू राज्यस्तरावर मंगळवेढयाचे ब्रँडींग व्हावे असे काम झाले पाहिजे. सीसीटीव्ही कॅमेर्यांची संख्या वाढली पाहिजे. काही व्यापारी बंधूंनी असहकार्य केल्यामुळे काही गुन्हे उघडकीस येवू शकले नाहीत तरी सीसीटीव्ही लावून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.वपर्यायाने जनतेचे व स्वतःचे रक्षण करावे.
यावेळी माजी नगरसेवक विजय खवतोडे, लतिफ तांबोळी, नारायण गोवे, फिरोज मुलाणी, दिलावर मुजावर आदिंनीही विविध सुचना केल्या.
या बैठकीस श्रीधर भोसले, यतिराज वाकळे, अजित जगताप, प्रविण खवतोडे, गौरीशंकर बुरकुल, युवराज घुले, शकील काझी, प्रकाश स्वामी, लक्ष्मण गायकवाड, रामभाऊ दत्तू, जाकीर रोंगीकर, रफिक इनामदार, ज्ञानेश्वर कोंडुभैरी, संभाजी घुले, प्रदिप खवतोडे, जनार्धन अवघडे,
संग्राम पवार, बबलु सुतार, संतोष रंदवे, मुझम्मिल काझी, दत्ता हजारे, साहेब शिंदे, इकारे, सागर खरबडे, येताळा खरबडे, आनंद इंगळे, गणेश कुर्हाडे, प्रतिक होडगे यांचेसह अनेक पोलिस पाटील, पत्रकार, विविध पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. शेवटी सहाय्यक पोलिस निरीक्षक बापुसाहेब पिंगळे यांनी सर्वांचे आभार मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज