टीम मंगळवेढा टाईम्स ।
मागील भांडणाचा राग मनात धरून मारूती नागणे यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले
आरोपी नागनाथ सावंजी यांना पंढरपूर जिल्हा सत्र न्यायाधीश तोष्णीवाल यांनी अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
या घटनेची हकीकत अशी , दि . २४ जुलै रोजी मंगळवेढा कारखाना रोडवर असलेल्या काका ढाब्याजवळ यातील आरोपी नागनाथ सावंजी यानी फिर्यादी तथा जखमी मारूती नागणे यास
मागील भांडणाचा राग मनात धरून आरोपी सावंजी व त्याचे मित्र गोवे यानी कोयत्याने वार करून लाथाबुक्याने मारहाण करीत जखमी केल्याची फिर्याद नागणे यानी पोलिसात दिली होती.
पोलिसानी सदर आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३२६ , २२३ , ५०४ सह ३४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता .
आरोपीच्यावतीने अॅड .धनंजय हजारे यांनी सदर फिर्यादीने केवळ घरगुती भांडणाचा रोष मनात धरून उशीरा फिर्याद दाखल केली असल्याचा युक्तीवाद न्यायालयासमोर मांडल्यानंतर हा युक्तीवाद ग्राह्य धरून
आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. यात आरोपीच्या वतीने अॅड . धनंजय हजारे व अॅड . सीमा ढावरे यांनी काम पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज