बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. A case has been registered against six gamblers in Sangola
बेहरे चिंचोली येथील जि.प.शाळेच्या पाठीमागे आडोशाला काही लोक मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पोना मंगेश पांढरे , सपोफौ पवार , पोना गवळी, पोकॉ माळी हे सदर ठिकाणी कारवाईसाठी गेले. त्या ठिकाणी गोल आकाराचे गोल रिंगण करुन चंद्रकांत नारायण सरगर , राजाराम जगन्नाथ खंडागळे , जयवंत शंकर बेहरे , वसंत महादेव बेहरे , धनाजी वसंत भोसले , सतिश अर्जून खरात सर्व रा.बेहरे चिंचोली ता . सांगोला हे मन्ना नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले.
यावेळी १ हजार ८०० रुपये रोख रक्कम , जुगार साहित्य जप्त केले. याप्रकरणी मंगेश पांढरे यांनी फिर्याद दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज