mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात ‘या’ गावात अवैध वाळू व्यवसायात पोलिस पाटीलच सामील, गुन्हा दाखल; LCB ची कारवाई

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 8, 2021
in सोलापूर, क्राईम
राष्ट्रीय महामार्गालगत आसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करणारे तिघे जेरबंद

टीम मंगळवेढा टाईम्स ।

गावातील कायदा सुव्यवस्था व महसूल यावर देखरेख राहावी तसेच गुन्हेगारी बेकायदेशीर व्यवसाय व अवैध धंदेवाल्यांवर चाफ बसावा यासाठी शासनाच्या वतीने गावागावांत निवड प्रक्रियाद्वारे पोलिस पाटलांची पदे भरण्यात आली.

यामुळे उच्चशिक्षित तरुण- तरुणींना गावातील उच्च मानाच्या पोलिस पाटील पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली.

परंतु अशाच गावगाड्यातील उच्चपदस्थ दसूर (ता. माळशिरस) येथील संशयित आरोपी पोलिस पाटील महेश शिंदे यांच्यावर अवैध वाळू धंद्याविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून गुन्हा दाखल करण्याची वेळ आली.

या कारवाईत मुद्देमालासह बारा लाख 32 हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.माळशिरस तालुक्‍यातील पूर्व भागातील खळवे येथील भीमा नदीसह दसूर व तोंडले – बोंडले येथील ओढ्यातील पाण्याची पातळी कमी झाली की येथील वाळू माफियांकडून अवैधरीत्या पात्रातील वाळू उत्खनन करून विक्री करण्याचा धंदा केला जातो.

अशाप्रकारे शुक्रवारी सायंकाळी दसूर परिसरात बिगर नंबर असलेला ट्रॅक्‍टर अवैधरीत्या वाळूची वाहतूक करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून पकडण्यात आला.

यामध्ये वाळूचा अवैध धंदा करणारे संशयित आरोपी पोलिस पाटील महेश अशोक शिंदे (रा. दसूर) व त्यांचा साथीदार मयूर ऊर्फ सोन्या मारुती चेडे (रा. खळवे) यांच्यावर वेळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर या कारवाईत सात हजारांच्या वाळूच्या मुद्देमालासह दहा लाख रुपयांचा ट्रॅक्‍टर, दोन लाख रुपयांची ट्रॉली, पंचवीस हजारांची मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.

ही कारवाई सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, शहर पोलिस उपनिरीक्षक खाजा मुजावर, पोलिस हेड कॉन्स्टेबल नारायण गोरेकर, मोहन मनसावले, धनंजय गाडे, पोलिस अंमलदार धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांच्या पथकाने केली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अवैध वाळू उपसागुन्हा दाखलपोलीस पाटील

संबंधित बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

कारागृहातील ‘यारी’ पडली भारी! मंगळवेढ्यात भरदिवसा निर्जन स्थळी थरार; ३ लाखांचे दागिने आणि रोकड लंपास; गुन्हेगारांचे धाडस वाढले

April 11, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

पतीने केला क्रूरतेचा कळस! ​मुलगी दे, नाहीतर मारून टाकीन; पतीने माहेरी घुसून पत्नीला रक्ताळले; मंगळवेढ्यात थरार; पती, सासू अन् नणंदेचा निर्लयीपणा

April 11, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

धक्कादायक! जेवण खाल्ल्याच्या रागातून पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात घातली कढई; मंगळवेढ्यातील संतापजनक घटना

April 9, 2026
Next Post

'धनश्री' च्या माध्यमातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी आर्थिक संकटातून जिल्ह्यातील साखर कारखानदारी बाहेर काढली : धनाजी साठे

ताज्या बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा