mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘धनश्री’ च्या माध्यमातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी आर्थिक संकटातून जिल्ह्यातील साखर कारखानदारी बाहेर काढली : धनाजी साठे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 8, 2021
in मंगळवेढा, सोलापूर

समाधान फुगारे ।

सोलापूर जिल्ह्यातील अनेक सहकारी व खाजगी साखर कारखाने हे सध्या आर्थिक संकटाशी सामना करीत आहेत. अशा साखर कारखान्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे काम ‘धनश्री’ च्या माध्यमातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी पार पाडले आहे असे प्रतिपादन कुर्मदास सहकारी कारखानाचे चेअरमन धनाजी साठे यांनी केले आहे.

धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचा ७२ व्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. ७ मार्च रोजी सकाळी १० वा. पंढरपूर रोड, एम.एस. ई. बी जवळ मंगळवेढा येथे रेवनिल ब्लड बँक सांगोला यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी आमदार धनाजी साठे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगळवेढच्या नगराध्यक्षा अरुणा माळी या होत्या. व्यासपीठावर प्रा.शिवाजीराव काळुंगे, मंगळवेढा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, कुरुलचे प्रा. माऊली जाधव, उद्योजक नागेश फाटे, प्रा. शोभाताई काळुंगे, दिगंबर भगरे, प्रभाकर कलूबर्मे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढे धनाजी साठे म्हणाले, ज्या साखर उद्योगाने शेतकऱ्याला ‘इन्स्टंट मनी’ची सवय लावली, तो साखर उद्योग आता अडचणीत आला आहे. त्याचबरोबर साखर कारखाने हे शेतकऱ्यांचे आर्थिक केंद्रबिंदु आहे.

या आर्थिक केंद्रबिंदू जिवंत ठेवण्यासाठी आर्थिक सहकारी चळवळीच्या माध्यमातून प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा.शोभाताई काळुंगे यांचे मोठे योगदान आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे नंदनवन व्हावे म्हणून आर्थिक संस्था उभा करण्याचा हेतू डोळ्यासमोर काळुंगे दाम्पत्य व त्यांचे इतर संचालक मंडळांनी ठेवला.

एकीकडे दुष्काळाला कारणीभूत असलेले पीक अशी उसाची ओळख वाढत चाललेली आहे. दुसरीकडे साखरेच्या आरोग्यावरील परिणामाबद्दल जगभर जागृती होते आहे. तिसरीकडे अवकाळी पाऊस आणि निसर्गाचे बदललेले गणित यामुळे उसातील गोडवा कमी होतोय.

या सर्वाहून महत्त्वाचे कारण म्हणजे, आता ऊस या पीकातून मिळणारे आर्थिक गणित कोलमडले आहे.अतिरिक्त उत्पादनामुळे देशातील साखरेची मागणी कमी होते आहे. साखर कारखानदारांनी साखरेबरोबरच  इथेनॉल आणि सहवीजनिर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत.

पण सरकारी धोरणे आणि प्रत्यक्ष कारखान्यावरील अडचणी यातून काही मार्ग निघताना दिसत नाही. शासनाने शेतकऱ्यांना उसाची रक्कम चौदा दिवसांत देण्यासाठी कायदा केला, मात्र साखरेच्या निर्मितीचा खर्च आणि विक्री यांचे आर्थिक गणित जुळवताना कारखान्यांच्या नाकी नऊ आले आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनावर होताना दिसत आहे.

परंतु सोलापूर जिल्ह्यात अंशतः ही सगळी उणीव भरून काढण्याचे काम प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या पुढाकाराने उभा राहिलेल्या धनश्री च्या आर्थिक सहकार्यच्या माध्यमातून होताना दिसत आहेत.

खरोखरच मंगळवेढेकर इतके भाग्यवान आहेत की, प्रा. शिवाजीराव काळुंगे, प्रा. शोभाताई काळुंगे व त्यांचा धनश्री परिवार यांचा सहवास या मंगळवेढातील लोकांना लाभला. ही अभिमानाची गोष्ट आहे. असे गौरवोद्गार काढत त्यांनी प्रा.शिवाजीराव काळुंगे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नंदकुमार शिंदे बोलताना म्हणाले, खऱ्याअर्थाने कोरोना संकटात लोकांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. असे रक्तदान शिबिरासारखे उपक्रम समाजाचे हिताचे असतात. असे सामाजिक हित जोपासण्यास प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री परिवार हा सदैव अग्रेसर असतो.

जगात रक्त हे कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सर्वांनी रक्तदान करून गरजू लोकांना जीवनदान देण्याचे आपल्या जीवनातील महत्वाचे कार्य पार पाडावे असे त्यांनी बोलताना सांगितले.

नगराध्यक्षा अरुणा माळी म्हणाल्या, धनश्री परिवाराच्या माध्यमातून सहकारातून महिला सक्षमीकरण हे समीकरण जुळवुन आणण्याचे काम प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा. शोभाताई काळुंगे यांनी धनश्री च्या माध्यमातून केले आहे.

महिला सशक्तीकरण, सबलीकरण सातत्याने कानावर पडणारे सवयीचे झालेले शब्द आहेत. सतत ऐकून त्यांचे फारसे महत्त्व वाटत नसले तरी एकूण समाज विकासासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे महिला सशक्तीकरणाची विविध क्षेत्रात महिलांची संख्या बोटावर मोजावी इतकीच होती.

बाकी सर्वसामान्य महिला प्रवाहापासून दूरच होत्या. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सहकार चळवळीमुळे साध्य होतांना दिसत आहे. महिलांच्या विविध संस्था, बचतगट या माध्यमातून महिला विकासाला एक नवीन दिशा मिळाली आहे.

स्वत: ची बचत करुन त्यातून बँका, पतसंस्थांच्या मदतीने कर्ज घेऊन स्वत: चा व्यवसाय सुरू करुन इतर महिलांच्या मदतीने तो वाढवून आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा आर्थिकस्तर उंचावणे अशा अनेक गोष्टी या बचतगटांच्या माध्यमातून होवू शकतात.

आर्थिक स्वावलंबन ही महत्त्वाची गोष्ट या गटांच्या माध्यमातून महिलांना मिळाली. प्रत्येक सहकारी संस्थेत दोन महिला संचालक असल्याच पाहिजे, असा नियम करण्यात आलेला आहे. त्यांचा योग्य उपयोग करुन प्रा. शिवाजीराव काळुंगे व प्रा.शोभाताई काळुंगे यांनी धनश्री महिला पतसंस्था ही स्वतंत्र महिलांसाठी सहकारी संस्था उभारुन महिला सशक्तीकरणाचे काम जोमाने वाढू शकते.

याचे जिवंत उदाहरण काळुंगे दाम्पत्य व इतर सहकाऱ्यांनी आपल्यासमोर ठेवले आहे. असे सांगत प्रा. शिवाजीराव काळुंगे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रा. शिवाजीराव काळुंगे, प्रा.शोभाताई काळुंगे, कुरुलचे प्रा. माऊली जाधव व उद्योजक नागेश फाटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक बबनराव आवताडे, माजी सभापती भुजंगराव पाटील, दामाजी शुगरचे चेअरमन समाधान आवताडे, माजी जि. प. सदस्य व्यंकट भालके, न.पा. पक्षनेते अजित जगताप, युन्नूसभाई शेख, मल्टिस्टेटच्या संचालिका डॉ. राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड, दीपाली काळुंगे – पाटील, उद्योजक प्रकाश काळुंगे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, राष्ट्रवादीचे लतीफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष बाबुभाई मकानदार, प्रमोद साळुंखे, सुहास पंडित, दामाजी शुगरचे माजी संचालक हर्षराज बिले, पांडुरंग भाकरे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश कोळेकर, पं. स. सदस्य ईश्वर गडदे, सोमन्ना संगोलकर, माजी उपसभापती रमेश भांजे, बसवराज पाटील, तानाजी काकडे, धनश्री मल्टिस्टेट व्हा. चेअरमन युवराज गडदे, संचालक रामचंद्र बंडगर, अविनाश मोरे,

रावसाहेब फटे, सांगोला न. पा. नगरसेवक सोमेश यावलकर, सिद्धेश्वर पाटील, सिद्धेश्वर जाधव, दादासाहेब इंगोले, लहू ढगे, सुयोग गायकवाड, सुभाष ढेकळे, सोमनाथ गुळमिरे, शशिकांत केदार, सागर कापले, उत्तम पाटील, सतीश दत्तु, आंधळगावचे माजी उपसरपंच दिगंबर भाकरे, निंबोणीचे माजी सरपंच अर्जुन खांडेकर, सोमनाथ बुरजे, धनश्री पतसंसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनीता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे , उद्योजक गंगाराम खांडेकर, सारंग पुजारी, राहुल खांडेकर, दिलीप वेळापुरे, कबीर शेख, राजू चव्हाण, निलेश आवताडे, संजय चव्हाण यांचेसह इतर
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दिवसभर त्यांच्या जीवनसाथी या निवासस्थानी उपस्थित राहून प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचा ७२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षांव केला.

याप्रसंगी सुमारे जवळपास १७२ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. यावेळी धनश्री परिवाराच्यावतीने प्रत्येक रक्तदात्यांना टी शर्ट भेट देण्यात आला. रक्तदानाचा हा कार्यक्रम सरकारने अटी घालून दिलेल्या कोविड नियमांचे पालन करून व्यवस्थितरित्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कल्याणी कोळी यांनी केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धनश्री बँकमंगळवेढाशिवाजीराव काळुगे

संबंधित बातम्या

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार

July 13, 2025
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

भयानक! वडिलांचे सहामहिन्यांपूर्वी निधन, जमीन नाही, स्वतःचे हक्काचे घर नव्हते, हलाखीच्या परिस्थितीमुळे मानसिक तणावाखाली १४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

July 12, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! खोट्या सोन्यावर तारण कर्ज घेण्याची मंगळवेढ्यासह तीन तालुक्यात साखळी, साेलापूर जिल्हा बँकेतील प्रकार, अनेकांवर होणार गुन्हे दाखल; ‘इतके’ शाखाधिकारी निलंबित

July 12, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी ‘या’ तारखेला सोडत; जनतेतून निवड; पुन्हा राजकीय गणिते जुळवावी लागणार

July 11, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

तीन सहकारी बँकांना आरबीआयकडून विविध कारणासाठी दंड; सोलापूर आणि…’या’ बँकेचा समावेश

July 11, 2025
पवार साहेब तुम्हीच न्याय मिळवून द्या! विठ्ठल कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा

आमदार अभिजीत पाटलांच्या विठ्ठल कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी 10 लाखांची खंडणी; सामाजिक कार्यकर्त्याला अटक

July 11, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

खळबळजनक! विहिरीतील पाण्यामध्ये पडल्याने मंगळवेढ्यातील डॉक्टराचा मृत्यू; पोलीस ठाण्यात खबर दाखल

July 10, 2025
दलित मित्र कदम गुरुजी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये औषधनिर्माणशास्त्र पदवी प्रवेश प्रकिया सुरु; विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

दर्जेदार शिक्षण! DMKG काॅलेज ऑफ फार्मसीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुविधा सुरू; प्रवेश प्रक्रिया ‘या’ तारखेपर्यंत चालणार; विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

July 10, 2025
Next Post
आईच्या कष्टाचे मुलीने केले सार्थक; मंगळवेढ्याची लेक चालली देशरक्षणासाठी सीमेवर

आईच्या कष्टाचे मुलीने केले सार्थक; मंगळवेढ्याची लेक चालली देशरक्षणासाठी सीमेवर

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

एकनाथ शिंदेंनी घेतली मंत्री-आमदारांची शाळा, शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय घडलं? शिंदे यांनी दिला आमदारांना ‘हा’ कडक इशारा

July 14, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर ताण, लाडकी बहीण योजना बंद होणार? मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या…

July 14, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खबरदार! ‘या’ तारखेला आंतरवाली सोडली तर मागे सरकणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस सरकारला इशारा

July 14, 2025
दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य राखीव पोलिस दलात आता महिलांना संधी मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन नियमित पदे निर्माण करण्यास दिली मान्यता

July 14, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार

July 13, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा