mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा ब्रेकिंग! चोरून वाळू घेऊन जाणाऱ्या वाळू माफिया ‘महादेव ईरकर’सह भावावर गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 21, 2021
in मंगळवेढा
राष्ट्रीय महामार्गालगत आसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करणारे तिघे जेरबंद

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील माणनदी पात्रातील ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये १ ब्रास वाळू चोरून भरून धर्मगाव ते मंगळवेढा रस्त्याने वाहतूक करणाऱ्या विशाल मारुती ईरकर व महादेव मारुती ईरकर (रा.भाळवणी,ता.मंगळवेढा ) या दोघा भावावर मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पो.कॉ.मनोज सुरेश राठोड यांनी दिली.

संशयित आरोपी विशाल मारुती ईरकर व महादेव मारुती ईरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई दि.१९ मार्च २०२१ रोजी धर्मगाव शिवारातील माण नदी पात्रातील बापू मेटकरी यांचे शेताशेजारी करण्यात आली.

याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की,१९ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ट्रॅक्टरचे (नंबर एमएच १३ – सी एस ५२४८) चालक विशाल मारुती ईरकर वमालक महादेव मारुती ईरकर यांनी लाल रंगाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीत धर्मगाव शिवारातील माण नदी पात्रातील वाळू चोरून धर्मगाव रस्त्याने नेताना आढळले.

या प्रकरणी पोलिसांनी ६ लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर व ट्रॉली, त्यातील ६ हजार रुपये किमतीची १ ब्रास वाळू असा ६ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास पोना अमर सुरवसे करीत आहेत.

बैतूल ऑईल मिल साडेसात कोटींची चोरी प्रकरणी आरोपींचा जामीन फेटाळला

आयकर विभागाने सील केलेल्या बैतूल ऑईल मिलच्या जागेमधून ७ कोटी ४७ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.जी. मोहिते यांनी फेटाळून लावला.

मनीष राजेंद्र बोथरा ( रा.कोंडी ) , रामचंद्र भर्तरी शिंदे ( रा . बाळे ) , दिलीपकुमार पवार ( रा . बैतूल मध्यप्रदेश ) , राम अविश यादव ( रा . नारायणपूर उत्तर प्रदेश ) , गणेश दत्तात्रय वाघमोडे ( रा . मोहोळ ) अशी जामीन फेटाळलेल्या पाचजणांची नावे आहेत.

याबाबत आयकर विभागाचे प्रकाश मिथलेश यांनी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . फिर्यादी हे कोंडी येथील बैतूल ऑईल मिल येथे आयकर विभागाच्या कारवाईसाठी गेले होते . पथकाने बंगल्यास सील लावून पथक कंपनीच्या बाहेर पडले होते.

रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी हे व्हिजीट करण्याकरता तेथे गेले . कंपनीजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये बॅगा होत्या . त्यामध्ये दोन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा होत्या .

तसेच कारच्या डिकीमध्ये असलेल्या बॅगमध्ये डायमंड होते . त्यावेळी बंगल्याचे ग्रील तोडलेले दिसून आले . त्याच ठिकाणी गॅस कटर व साहित्य पडलेले होते. या घटनेची सोलापूर तालुका पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते त्या ठिकाणी दाखल झाले.

त्यावेळी आरोपींच्या कारमधील ७ कोटी ४५ लाख रुपयांची रोकड ताब्यात घेवून ती एसबीआय बँकेमध्ये जमा करण्यात आली . तसेच ३० कोटी २८ ला रुपयांचे हिरे व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

ADVERTISEMENT

याबाबत तालुका पोलिस ठाण्यात पाचजणांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . न्यायालयाने पाचही जणांचा जामीन फेटाळून लावला . यात सरकार कडून अॅड . प्रदिपसिंग राजपूत , तर आरोपीच्यावतीने अॅड . आर . आर . पाटील , अॅड . अरविंद अंदोरे यांनी काम पाहिले.

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अवैध वाळू उपसागुन्हा दाखलमंगळवेढा पोलीस स्टेशनमहादेव इरकर
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

दामाजी कारखाना निवडणूक! उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या १२ व्या दिवशी ‘एवढ्या’ जणांची माघार

June 25, 2022
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

शेतकऱ्यांनो! दामाजी कारखान्याचे ‘या’ तारखेपर्यंतचे ऊसाचे बिल खात्यात वर्ग; कार्यकारी संचालकांची माहिती

June 24, 2022

मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जातीवाचक; एकाविरूध्द गुन्हा दाखल

June 23, 2022
खळबळ! मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह; नवरदेवासह अन्य ५० ते ६० वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल

खळबळ! मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह; नवरदेवासह अन्य ५० ते ६० वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल

June 24, 2022
संतापजनक! दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून

गेम आली अंगलट! मंगळवेढ्यात Dream 11 चा बळी; पैशासाठी डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून भावाचा केला खून

June 23, 2022
मंगळवेढा हादरला! कॉलेज तरुणाची निर्घृण हत्या; संपूर्ण गावात शोककळा

मंगळवेढा हादरला! कॉलेज तरुणाची निर्घृण हत्या; संपूर्ण गावात शोककळा

June 22, 2022
मंगळवेढ्यातून भरदिवसा मोटारसायकलची चोरी; घरफोडी, मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; ‘या’ ठिकाणी झाल्या चोऱ्या

घरफोडी! मंगळवेढ्यात बंद घराचे कुलूप तोडून बचत गटाच्या पैशासह २ लाख २२ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला

June 24, 2022
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात एका युवकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट

June 24, 2022
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे विठ्ठल व दामाजी कारखान्याच्या निवडणुकीवर परिणाम होणार

June 22, 2022
Next Post
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

भाजप मधून पोटनिवडणुक लढवण्यासाठी मोठी चुरस,चौघेजण इच्छुक; आवताडे,परिचारकांचे नाव आघाडीवर

ताज्या बातम्या

शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

Big Breaking! शिंदे गटाचं नाव ठरलं; ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असे नामकरण होणार

June 25, 2022
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात एक लाखाची देशी दारू जप्त; ठाकरे, पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; एकावर गुन्हा दाखल

June 25, 2022
राष्ट्रीय महामार्गालगत आसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करणारे तिघे जेरबंद

दैवी शक्तीच्या आधारे पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने; सोलापूरच्या एकाची १५ लाखांची फसवणूक

June 25, 2022
सोलापूरच्या शिवसेना माजी मंत्र्याच्या निधनाची अफवा; फेक पोस्टने उडाली खळबळ

समजून घ्या! एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकतात का? शिवसेनेची घटना काय सांगते?; ‘शिवसेनाप्रमुख’ पदाला काय आहेत अधिकार?

June 25, 2022
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

दामाजी कारखाना निवडणूक! उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या १२ व्या दिवशी ‘एवढ्या’ जणांची माघार

June 25, 2022

सोलापूरच्या ग्रामीण भागात संथगतीने वाढतोय कोरोना; ‘इतक्या’ अँक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू

June 25, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा