टीम मंगळवेढा टाईम्स ।
लोकसेवक पदावर असताना ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल ४७० टक्के अधिक म्हणजे ९ कोटी ६९ लाख ५ हजार ९० रुपयांची अपसंपदा (संपत्ती) बाळगल्याप्रकरणी
बार्शीचे पंचायत समितीचे माजी सभापती अनिल डिसले यांच्यासह त्यांची पत्नी व दोन मुलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून अॅक्शन घेतली आहे. या प्रकरणी बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
अनिल बाबुराव डिसले, त्यांची पत्नी संगीता अनिल डिसले, मुलगा सागर व स्वप्नील अनिल डिसले (सर्व रा. ज्योतिबाची वाडी बार्शी) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी चौकशी करून बार्शी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, सन १९९७ ते मार्च २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला असल्याचे म्हटले आहे.
यातील मुख्य आरोपी अनिल डिसले हे बार्शी पंचायत समितीचे सभापती होते. त्यांनी १९९७ ते मार्च २०२२ या कालावधीत विविध पदे भूषविली.
या काळात त्यांनी भ्रष्ट मार्गाने मोठ्या प्रमाणात अपसंपदा मिळवली. त्यांच्यासह त्यांची पत्नी व मुले यांची ज्ञात उत्पन्नापेक्षा ४७० टक्के अपसंपदा होत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या तपासात समोर आले.
दरम्यान, अनिल डिसले यांनी कमावलेली मालमत्ता अपसंपदा असल्याचे पत्नी तसेच दोन मुले यांना माहीत असतानाही त्यांनी ती स्वतःच्या कब्जात बाळगून त्यांना सहाय केल्याने पत्नी व दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक तपास करत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज