मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
कोणत्याही दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय व त्याच्या आर्थिक प्रगतीसाठी शासन कर्ज देते. याचा लाभ मतिमंद व्यक्तींना घेता येत नाही. मात्र, मतिमंद मुलाचे पालकत्व स्वीकारणाऱ्या पालकास मुलाऐवजी कर्ज घेता येणार आहे.
यासाठीची मदत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत होणार आहे, अशी माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी दिली.
मतिमंद मुलाच्या वतीने त्याच्या पालकांना कर्ज मिळणार असून, कर्जाच्या परतफेडीस पालक जबाबदार असणार आहे. मुलाच्या वतीने आर्थिक व्यवहार करण्याचा अधिकार पालकांना मिळतो.
यासोबतच मतिमंद मुलाच्या पालकांना शासनाची पेन्शन असल्यास ती पेन्शन त्या मुलांना देण्याची तरतूद आहे. हा लाभ देण्यापूर्वी मुलाचे पालकत्व कुणाकडे आहे, हे तपासण्यात येणार आहे.
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाची बैठक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कोहिनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली सनील खमितकर यांनी बैठकीला मार्गदर्शन केले.
दिव्यांग व्यक्तींच्या जमीन व जागा संदर्भात महसूल विभागाकडे काही प्रश्न प्रलंबित असतील, तर ते सोडविणे, ग्रामपंचायत विभागाच्या पाच टक्के निधी, नगरपालिका, नगरपरिषदेचा पाच टक्के निधी, महापालिका क्षेत्रातील पाच टक्के निधीचे नियोजन करून, दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांद्वारे लाभ देण्याविषयीचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या.
समाजकल्याण विभागाचे सहकार्य
कर्ज, दाखले, प्रमाणपत्रे यासंबंधीची सगळी मदत दिव्यांग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत समाजकल्याण विभाग करणार आहे. यासाठी जुलै महिन्याच्या शेवटच्या ‘आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा उपक्रम होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज