मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी सरकारने गुडन्यूज दिली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15 हजार पदे भरण्यात येणार असून त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती.
आता, या भरतीमध्ये सन 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक वेळची संधी देण्यात येत आहे, विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
राज्याच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली आणि 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन 15 हजार पदांची पोलीस भरती करण्यात येत आहे.
पाच प्रकारच्या पदांसाठी ही भरती होणार असून त्याची जाहिरात प्रकाशित झाली आहे.या पोलिस भरती प्रक्रियेकरीता ज्यांची वयोमर्यादा संपली होती अशा सन 2022 ते 2025 पर्यंतच्या सर्व उमेदवारांनाफॉर्मभरुन भरतीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा सर्वच उमेदवारांना लाभ घेता येईल.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून याबाबतचे शुद्धिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना ही चागंली संधी आहे. दरम्यान, गेल्या 2-3 वर्षांपासून पोलीस भरती रखडली होती. त्यामुळे, विद्यार्थ्यांसह विविध संघटनांकडून भरतीची मागणी केली जात होती. अखेर, भरती प्रक्रिया सुरू झाली असून वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही शासनाने संधी देऊ केली आहे.
शासन परिपत्रकात काय म्हटले
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली आणि 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी
एकूण 15,631 पदे भरतीसाठी राबविण्यातयेणाऱ्या भरती प्रक्रियेस शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक नुसार सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे.
मात्र, शासनाच्या नव्या शुद्धपत्रकानुसार, सन 2022, 2023, 2024 व 2025 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे.”, असे आदेशच शासनाने दिले आहेत. त्यामुळे, 2022 ते 2025 या 4 वर्षांच्या कालावधीतील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.
भरण्यात येणारी पदांची संख्या खालीलप्रमाणे
– पोलीस शिपाई – 10 हजार 908
– पोलीस शिपाई चालक – 234
– बॅण्डस् मॅन – 25
– सशस्त्री पोलीस शिपाई – 2,393
– कारागृह शिपाई – 554
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज