मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोशल मीडियावर श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील एका व्यक्तीला मला तुमचा स्वभाव खूप आवडला, तुम्ही मला कुडुवाडीत भेटायला या, असे म्हणत एका महिलेने साथीदारांना घेऊन पाच लाख रुपयांची मागणी करत मारहाण केली आणि त्याला डांबून ठेवल्याची घटना कुई (ता. माढा) येथे घडली.
याबाबत सोमनाथ सुभाष निंबाळकर (वय ३१, रा. बेलवंडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी कुडुवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. कुकण शिंदे, नीलम काळे, कोयल शिंदे, अनोळखी चार व्यक्ती आणि एक महिला अशा एकूण आठ आरोपींविरुद्ध (सर्व रा. कुई) गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीस सोशल मीडियावर एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली.
त्यानंतर त्या महिलेने व्हिडीओ कॉल करून मैत्री केली अन् भेटायला बोलावले.
दि.९ सप्टेंबर रोजी पुन्हा या महिलेने व्हिडीओ कॉल करून ‘कधी भेटायला येताय, तुम्ही नुसते नादी लावता, या भेटायला’ असे सांगितले.
त्यानंतर त्याच दिवशी फिर्यादी हा एकटा मोटारसायकलवर त्या महिलेला भेटायला निघाला.
रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी कुर्दुवाडीमध्ये आला. त्यानंतर आरोपी महिलेने मोबाइलवर लोकेशन पाठवून सांगितलेल्या ठिकाणी येण्यास सांगितले.
फिर्यादी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर महिला अन् तिची एक मैत्रीण तिथे आली. त्यानंतर तिथे भेटून निघतो, असे म्हणताच अंधारातून तोंडाला रुमाल लावून पाच ते सहा व्यक्ती तेथे आले. त्यापैकी दोघांनी पाठीमागून उचलून फिर्यादीला त्याच्याच गाडीवर बसवून अनोळखी ठिकाणी पत्राशेडमध्ये घेऊन गेले.
तिथे हात-पाय बांधून डांबून ठवत, ‘तू दुष्कर्म केले आहेस. पाच लाख रुपये दे.. नाहीतर तुला खलास करून टाकतो,’ अशी धमकी देत कपडे काढून पट्टयाने मारहाण केली.
आवाज आला अन फिर्यादीची सुटका झाली
फिर्यादीच्या पत्नीस पैसे आणण्यासाठी फोन करायला लावला. १० सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास त्या भागात पोलिस गाडीच्या सायरनचा आवाज आल्याने फिर्यादीची सुटका केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज