टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर व तालुका सकल मराठा समाज यांचे कडून जाहीर आवाहन करणेत येते की मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांचे वर्षभरातील सहावे आमरण उपोषण आहे व गेले 8 दिवसापासून त्यांचे आमरण उपोषण सुरू आहे.
जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे परंतु सरकार या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून एक प्रकारे जरांगे पाटील व मराठा समाजाच्या संयम व सहनशीलतेचा अंत पहात आहे व समाजाची अवहेलना करत आहे.
या निष्ठूर व निर्दयी सरकारचा निषेध व मनोज दादा जरांगे यांचे समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या बंदमध्ये
सर्व कार्यालये राहणार बंद
सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था व व्यापारी यांनी बंदला पाठिंबा देवून खुलेपणाने बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाज मंगळवेढा तालुका यांच्यावतीने करण्यात आले.
शाळा, महाविद्यालयं, आस्थापनाचा समावेश
बंदमध्ये शाळा, महाविद्यालय, खासगी आस्थापना, दुकाने, बाजारपेठा, भाजीमंडई, मार्केट यार्ड यांसह अन्य आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. यासाठी सकल मराठा समाज सर्वाना आवाहन करीत आहे. या बंदमध्ये सर्व जाती धर्मातील व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, संस्था, सर्वपक्षीय राजकीय लोकप्रतिनिधींचा समावेश असणार आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज