टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. १३ मे पासून निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
एकूण ४८ सदस्यांसाठी निवडणूक होणार असून रविवार, ५ जून रोजी मतदान आहे.
दि.१३ मेपासून उमेदवारी अर्जविक्री व स्वीकृतीला प्रारंभ होणार आहे. ११ तालुक्यांतील ४२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या.
सर्वाधिक अक्कलकोट तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नियोजित आहे. १४ ग्रामपंचायतींमधील १४ सदस्यांसाठी निवडणूक नियोजित आहे.
मंगळवेढा तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींच्या ३ जागांसाठी, करमाळा तालुक्यातील २ ग्रामपंचायतींच्या दोन सदस्यांसाठी माढामधील दोन ग्रामपंचायतींच्या २ जागांसाठी, बार्शीमधील ५ ग्रामपंचायतींच्या ५ जागांसाठी,
उत्तर सोलापूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतच्या १ जागेसाठी , 9 मोहोळमधील २ ग्रामपंचायतींच्या ३ जागांसाठी,
पंढरपूरमधील २ ग्रामपंचायतींच्या दोन जागांसाठी , माळशिरसच्या ५ ग्रामपंचायतींच्या ७ जागांसाठी , सांगोल्यातील १ ग्रामपंचायतीच्या १ जागेसाठी , दक्षिण सोलापूरमधील ५ ग्रामपंचायतींच्या ८ जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.
असा आहे कार्यक्रम
■ १३ ते २० मे : अर्जविक्री व स्वीकृती
■ २३ मे , दुपारी ३ पर्यंत प्राप्त अर्जांची छाननी
■ २५ मे : अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस
■ २५ मे : दुपारी ३ पर्यंत : उमेदवारांची अंतिम यादी चिन्हासह प्रसिद्धी
■ ५ जून : मतदान ■ ५ जून मतमोजणी करण्यात येणार.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज