टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मार्च महिन्यापासून सरकारने लॉकडाऊन सुरू केला आहे. त्यामुळे पोलिसांची यंञणा बंदोबस्त, नाकाबंदी, कंटेन्मेंट झोन याकामात व्यस्त असल्याचे लक्षात घेऊन पंढरपूर शहरात पाच व तालुक्यात एक असे एकूण सहा ठिकाणी घरफोडी करणार्या चोरटयांना जेरबंद करुन १ लाख २२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी दिली.Burglars arrested; One lakh 22 thousand rupees confiscated pandharpur police
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सागर हराळे (वय २९रा. पन्हाळा जि.कोल्हापूर, हल्ली रा. नामानंद महाराज मठ, पंढरपूर), लखन काळे (वय २१ रा, अर्बन बँकजवळ, जुने कोर्टाच्या पाठीमागे, पंढरपूर यांच्या दोन साथिदारासह शहरात पाच ठिकाणी घरफोड्या केल्या असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे. या आरोपिंकडून २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घरफोड्या करणार्या अट्टल चोरट्यांना पंढरपूर पोलिसांनी केले जेरबंद! 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त @SpSolapurRural @AnilDeshmukhNCP @DGPMaharashtra @DrDilipP_IAShttps://t.co/RoeyADLchi pic.twitter.com/XCM1droQCk
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) July 22, 2020
तसेच शहरातील लोणार गल्ली येथील संदेश नवञे यांच्या घरातील तीन गंठण सौरभ नवञे (वय २५, लोणार गल्ली, पंढरपूर) अंतिम तपासाअंती निष्पन्न झाले आहे. तसेच शहरातील तिरंगा नगर येथील रंजना जाधव (वय,६५) यांच्या गळयातील सोन्याचे गंठण हे मोटारसायकलवरुन येणार्या दोघांनी हिसका मारुन पळवुन गेले होते. याप्रकरणाचा तपास करुन शंकर उर्फ पप्पू सुळ (वय २५), दुर्योधन उर्फ बबलु कांतीलाल चोरमाले (वय२० दोघे रा. गौंदी ता.इंदापूर जि.पुणे) यांना अटक केली आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.अरुण पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि. नवनाथ गायकवाड, पो.हे.कॉ. सुजित उबाळे, बिपीनचंद्र ढेरे, सुरज हेंबाडे, पो.ना. गणेश पवार, सतिश चंदनशिवे, चच्छिंद्र राजगे, इरफान शेख, अभिजीत कांबळे, शोएब पठाण, प्रसाद औटी, संदिप पाटील, सुजित जाधव, सिध्दनाथ मोरे, संजय गुटाळ, समाधान माने यांनी केली असून पुढील तपास सपोनि नवनाथ गायकवाड, हवालदार सुजित उबाळे व सुरज हेंबाडे हे करीत आहेत.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज