समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेत मांडला. महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.तर एकीकडे शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार,तर पेट्रोल दरवाढीमुळे महागाई वाढणार असल्याचे विरोधाकडून टीका केली जात आहे.
महाविकास आघाडी सरकारचे 100 दिवस आज पूर्ण झाले असं पवार म्हणाले. सध्याचा काळ आर्थिकदृष्ट्या गुंतागुंतीचा आणि कसोटीचा आहे. देशपातळीवरील बाबींचा परिणाम राज्यावरही जाणवतोय. मंदीमुळे तणावाखाली असलेली जागतिक अर्थव्यवस्था कोरोना व्हायरसमुळे अधिक तणावाखाली आली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून हा अर्थसंकल्प मांडण्यात येत आहे.
केंद्रीय करातील उत्पन्नाच्या वाट्याची रक्कम 8453 कोटींनी कमी झाली आहे.
केंद्राकडून राज्याला GSTच्या नुकसानाची रक्कम मिळायला उशीर होतोय, असंही अजित पवार म्हणाले.
1. 35 कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली, उरलेली रक्कम खरीप हंगाम 2020च्या आधी वर्ग करण्यात येईल.
2. नवीन योजना- 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या काळातल्या पीककर्जासाठी शेतकऱ्यांना 2 लाखांचा लाभ देण्यात येईल.
3. 8000 कोटी जलसंधारण योजनांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी – मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना हा नवीन कार्यक्रम 2010 कोटींचा निधी
4. सिंचनासाठी 10 हजार 235 कोटी निधीची तरतूद
5. कोकणच्या काजू प्रकल्पासाठी 15 कोटींचा निधी
6. महामार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी 3 हजार 500 कोटी तरतूद. 3 वर्षांत काम होणार, 1 हजार 200 कोटी – सेंट्रल रोड फंडातून देण्याचं नितीन गडकरींनी राज्याला वचन दिलं आहे.
7. महामार्गावर 20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र, 3 हजार 595 कोटींचा निधी सागरी महामार्गांसाठी, तीन वर्षांत रेवस-रेड्डी सागरी महामार्ग पूर्ण करण्याचा सरकारचा मानस
8. पुण्यात मेट्रोचा विस्तार होणार, पुणे मेट्रोसाठी गेल्या 5 वर्षांपेक्षा जास्त निधी देणार, 1657 कोटींचा निधी मेट्रोच्या राज्यभरातल्या कामांसाठी देण्याचा सरकारचा विचार.
9. महामंडळाच्या ताफ्यात वाय-फाय युक्त बस देण्यात येईल, दर्जेदार मिनी बस खरेदी करणं प्रस्तावित, महामंडळाच्या ताफ्यातल्या जुन्या बसच्या जागी 1600 नवीन बस येणार, बस स्थानकं अत्याधुनिक होणार. त्यासाठी 401 कोटी रुपयांची तरतूद.
10. साताऱ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत – 4 हजार कोटींची तरतूद, शासकीय मुद्रणालयासाठी नवीन यंत्रसामुग्री, नूतनीकरण 25 कोटीराज्यातल्या आरोग्य सेवांच्या 187 इमारतींची सर्व कामं 3 वर्षांत पूर्ण करणार.
11. वैद्यकीय शिक्षणासाठी 2 हजार 500 कोटींची तरतूद. आरोग्यसंस्थांची कमतरता पूर्ण करणार. आरोग्य संस्थांसाठी 5 हजार कोटी, 75 नवीन डायलिसीस केंद्र, 500 नवीन रुग्णवाहिका
12. प्राथमिक आरोग्यासेवेसाठी 5 हजार कोटी, पाटण आणि साकोलीतल्या रुग्णालयांचं 100 खाटांच्या रुग्णालयात रूपांतर होणार
वाभळेवाडी, शिरूर शाळेच्या धर्तीवर सगळ्या शाळा आदर्श शाळा करणार. 1500 शाळा आदर्श करणार, सीमाभागातल्या मराठी शाळांच्या पाठिशी उभे राहणार. 10 कोटींचं सहाय्य करणार.
13. कर्नाटकातल्या मराठी वर्तमानपत्रात जाहिराती देण्यात येणार, कर्नाटकातल्या मराठी शाळांना अनुदान देण्यात येईल.
14. क्रीडा संकुलांसाठीच्या अनुदानात वाढ, पुण्यात क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेचा प्रस्ताव, पुण्यात ऑलिम्पिक भवन बनवण्याचा सरकारचा मानस.
15. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय – डिजिटाजेशनसाठी 5 कोटींचं विशेष अनुदान, एशियाटिक सोसायटीलाही विशेष अनुदान मिळणार.
16. 3 ते 5 वर्षांसाठी तरुणांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आखल्या आहेत. नवीन शिकाऊ उमेदवारी योजना – इंर्टनशीप योजना, नवीन उद्योगांमध्ये रोजगारक्षम बनवण्यासाठी प्रयत्न – ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार – प्रति उमेदवार दरवर्षी 60 हजार रुपयांची तरतूद, 6 हजार कोटींचा अंदाजित खर्च ही योजना 15 ऑगस्ट 2020 पासून योजना सुरू होणार.
17. स्थानिकांना नोकऱ्यांत प्राधान्य देण्याचा प्रयत्न, 80 टक्के नोकऱ्या स्थानिकांना मिळण्यासाठी आम्ही कायदा करणार.
18. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबवणार – स्वयंरोजगार राबवण्यास प्रोत्साहन देणार यासाठी 130 कोटींची तरतूद, कौशल्य विकास आणि उद्योजकता 501 कोटी
19. महिला बचतगट चळवळ गतिमान करण्यासाठी राज्यासाठीची 1 हजार कोटीची खरेदी महिला बचत गटाकडून करण्याचा विचार. त्यानुसार खरेदी धोरणात सुधार करण्याचा विचार
20. महिला सुरक्षा – प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात महिला पोलीस ठाणे असेल, महिला अत्याचारांच्या तपासासाठी विशेष तपास पथक, महिला – बालविकास 2110 कोटींचा निधी.
21. माध्यमिक शाळांतील किशोरवयीन मुलींना माफक दरांत सॅनिटरी नॅपकिन, वापरलेल्या नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्र बसवणार.
22. 10 रुपये शिवथाळी भोजन योजना – प्रत्येक केंद्रावर 500 जणांना भोजन देणार – 1 लाख थाळींचं उद्दिष्टं – 150 कोटीग्लोबल वॉर्मिंग – वनक्षेत्र वाढवणं, सौरऊर्जा – पवनऊर्जा – विशेष समर्पित निधीची गरज, पर्यावरण विभागाला 230 कोटींचा निधी, 50 कोटी वृक्ष लागवड – आढावा घेऊन नवीन लागवड- 1630 कोटी
23. पर्यटन – वरळी दुग्धालयाच्या जागेवर नवीन पर्यटन केंद्राची निर्मिती होणार. त्यात मत्स्यालय असेल. अंदाजित किंमत 1 हजार कोटी असेल.
24. मुंबईतील पर्यटन विकासासाठी – 100 कोटी दरवर्षी देणार, हाजीअलीचा विकास आराखडा तयार करणार यासाठी 10 कोटींची तरतूद
पाचगणी -महाबळेश्वर – वेण्णा तलाव सुशोभीकरण – 100 कोटींची तरतूद
25. महात्मा गांधीच्या मणीभवनाचं नूतनीकरण – 25 कोटी, महाराष्ट्र राज्य स्थापना हीरकमहोत्सव – 55 कोटी – सातारा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय 12 कोटी
26. 100 व्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने नाट्यसंमेलनाला 10 कोटींचं अनुदान
27. तृतीयपंथीयांसाठी महामंडळाची स्थापना 5 कोटींची तरतूद
28. मागासवर्गीय मुलांसाठी मुंबईत वसतीगृह होणार, गोरगरीबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी 120 कोटींची तरतूद
29. सारथी पुणे संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवून मदतीसाठी 50 कोटींचा निधी
30. जिल्हा वार्षिक योजना – 2 हजार 800 कोटी
31. मुंब्रा – कळवा इथे हज हाऊस प्रस्तावित
32. सामाजिक न्याय विभागासाठी 9 हजार 668 कोटी प्रस्तावित
33. राज्यातले विविध उद्योग आर्थिक विवंचनेत आहेत, करसवलत प्रस्ताव – मुद्रांक शुल्क – बांधकाम क्षेत्रातली मंदी – MMRDA, पुणे, नागपूर, नोंदणी शुल्कात 1% सवलत
34. पेट्रोल डिझेलवर अतिरिक्त 1 रुपये , त्यातून ग्रीन फंडची निर्मिती होणार
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज