टीम मंगळवेढा टाईम्स । तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी हुलजंती मंडलचे मंडल अधिकारी सत्यवान निवृत्ती घुगे यांनी दहा हजाराची लाच स्विकारताना लाच लुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान या कारवाईमुळे अधिकारी व कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.
या घटनेची हकिकत अशी,तक्रारदार याने लवंगी येथे एक एकर जमीन विकत घेतली होती. सदर जमिन खरेदीचे दस्तावर हरकत घेणारा तक्रारी अर्ज आला होता. या अर्जावर तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी आरोपी तथा मंडल अधिकारी सत्यवान घुगे याने 10 हजार रुपयाची लाच मागितली होती.
याबाबत तक्रारदाराने दि. 23 रोजी सोलापूर येथे लाच लूचपत विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली होती. याची पडताळणी केली असता मंगळवेढा येथील तहसील कार्यालयात 10 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले होते. यावेळी सापळा लावला असता रक्कम स्विकारत असताना रंगेहाथ पकडले.
सदरची कारवाई पुणे येथील लाच लुचपतचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलिस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे पोलिस उपअधिक्षक संजय पाटील,पोलिस निरिक्षक जगदीश भोपळे,महिला पोलिस निरिक्षक कविता मुसळे,पोलिस नाईक अर्चना स्वामी,पोलिस हवालदार चंद्रकांत पवार,पोलिस नाईक पदमानंद चंगरपल्लू,पोलिस नाईक प्रमोद पकाले यांनी हा सापळा यशस्वी केला.
दरम्यान,आरोपी घुगे यांच्याविरूध्द रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला असून लाचलुचपत पथकाने त्या मंडल अधिकार्याच्या घराची झडती घेतली आज न्यायालयात उभे केले जाणार आहे. या मंडल अधिकार्याच्या या पुर्वीही पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत होत्या.
मात्र वरिष्ठ अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज कारवाईची वेळ आल्याची चर्चा ऐकावयास मिळत होती.तसेच हाताखाली झिरो ठेवून खडी क्रशरकडील हप्तेही झिरोच्या माध्यमातून वसूल केले जात असल्याचा बोलबोला या घटनेनंतर सुरु होता.
जिल्हा परिषदेच्या रेस्टहाऊसमध्ये मंडल अधिकार्याला पकडल्यानंतर झिरोवाले,वाळूमाफिया सभोवताली फिरत असल्याचे चित्र होते.
The bribe-taker accused the board officer of taking money to settle the case on behalf of the complainant
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज