टीम मंगळवेढा टाईम्स ।
माढा लोकसभा मतदारसंघातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज खासदार शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. तर दुसरीकडे रात्री भाजपा सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
हा भाजपासाठी पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का मानला जात आहे. भाजपाने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली, या यादीत भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली.
या उमेदवारीवरुन अकलूजचे मोहिते पाटील नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावरुन काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरू होत्या. धैर्यशील मोहिते पाटील खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू होत्या.
दरम्यान, काल धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले होते. आता त्यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याची उत्सुकता कायम आहे. ही जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे असल्याने मागील काही दिवसांपासून अनेक नावांवर चाचपणी करण्यात आली.
धैर्यशील मोहिते पाटील हे रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यापासून नाराज होते. मोहिते पाटील समर्थकांनी अकलूजमध्ये बैठक घेऊन शक्तिप्रदर्शन केले होते. तेव्हापासून मोहिते पाटील हे पवारांसोबत जातील अशी चर्चा होती. त्यानंतर काल प्रत्यक्षात पुण्यात ही भेट झाली.
त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाची मोठी डोकेदुखी होणार आहे. उद्या १३ एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील हे अकलूज इथं शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून हातात तुतारी घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज