टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेमध्ये मंगळवेढा तालुक्यातील रोहित भगरे व प्रदीप शिंदे या दोघांनी यश मिळवले आहे.
रोहित उत्तम भगरे यांने खुल्या प्रवर्गात 62 वा क्रमांक घेत त्याची विक्रीकर निरीक्षक या पदासाठी निवड झाली.
भगरे यांचे प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्या शाळा क्रमांक एक मध्ये झाले आहे पाचवी ते दहावी शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे झाले आहे.
तर अकरावी बारावी दामाजी महाविद्यालयात तर बारावीनंतरचे अभियांत्रिकी शिक्षण वालचंद कॉलेज सांगली या ठिकाणी करून त्याने पुणे येथे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली.
याशिवाय हाजापुर येथील प्रदीप नंदकुमार शिंदे याने इतर मागासवर्गीय प्रवर्गात 55 व्या परिक्षेत उत्तीर्ण होत या पदासाठी पात्र ठरला.
त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाजापूर येथे तर माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे स्वेरीस कॉलेज ऑफ फार्मसी गोपाळपूर येथे बी फार्मसीचे पदवीचे शिक्षण घेऊन त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली.
कोरोनामुळे त्याला पुणे येथील अभ्यासाची तयारी थांबल्यामुळे मंगळवेढा येथील अभ्यास केंद्रामध्ये त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करत
सन 2021 मध्ये आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीनुसार दिलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होत त्यांनी या पदासाठी त्याची निवड झाली आहे.
त्याच्या यशाबद्दल आ.समाधान आवताडे, शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष अँड.सुजित कदम, भगीरथ भालके, पक्षनेते अजित जगताप, विश्वनाथ शिंदे, अजित शिंदे, सुभाष काटकर, मिलिंद आटकळे, विलास आवताडे, प्रशांत यादव, सरपंच धनाजी बिचुकले, उद्योजक शिवाजी फटे, माधवानंद आकळे यांनी अभिनंदन केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज