टीम मंगळवेढा टाईम्स । राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांच्या अस्थी दर्शनासाठी आज बुधवार दि.१९ ऑगस्ट रोजी युटोपियन शुगर्स येथे ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा दुध संघाचे संचालक औदूंबर वाडदेकर यांनी दिली.
सुधाकरपंत यांचा अस्थिकलश सकाळी ९ ते ११ या वेळेत युटोपियन शुगर्स येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून ११.०० वा . सदरचा अस्थिकलश विसर्जनासाठी पंढरपूरकडे रवाना करण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी ९ ते ११ या वेळेत सोशल डिस्टन्सीचे पालन करून अस्थिदर्शनासाठी यावे असे आवाहन औदुंबर वाडदेकर यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज