टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपालिकेचे नगरसेवक पांडुरंग शिवाजी नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पांडुरंग नाईकवाडी मित्र परिवार यांच्या पुढाकाराने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवेढ्यातील गैबीसाहेब दर्गा मुजावर गल्ली येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराची सुरुवात होणार आहे.
सोलापुरातील अक्षय ब्लड बँक रक्त संकलनासाठी येणार आहे, अशी माहिती अरविंद कोळी यांनी दिली.
अनेक गरीब व गरजूंना रक्ताची मोठी गरज भासत असते. मात्र, मागील वर्षी रक्ताचा तुडवडा भासत असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते.
देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित केल्याची माहिती पांडुरंग नाईकवाडी मित्र परिवाराच्यावतीने देण्यात आली.
मंगळवेढेकरांनी आपली सामाजिक जबाबदारी समजून मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन आयोजक तथा पांडुरंग नाईकवाडी मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज