mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांकडून सालगडी शोधमोहीम सुरू!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
शेतकऱ्यांकडून सालगडी शोधमोहीम सुरू!



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातही अनेक सोयी-सुविधा निर्माण झाल्याने प्रत्येक कुटुंबाचा खर्च वाढला आहे. मागील तीन वर्षांपूर्वी केवळ 40 ते 50 हजाराला मिळणारा सालगडी यंदा शेतकर्‍यांसाठी लाखमोलाचा ठरत असून त्याच्यासाठी सुमारे वार्षिक मजुरी लाखभर रुपये देण्याची वेळ आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवसापासून नवा सालगडी ठेवण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात सुरु झाली आहे. मोठे क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांकडून सालगडी शोधण्याची मोहिम सध्या सुरू झाली आहे.

भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखण्यात येतो. सोलापूर जिल्हा हादेखील कृषीप्रधान जिल्हा आहे.जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्ष उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकीक कमाविला आहे. बागायतदार शेतकर्‍यांना शेतात औषधांची फवारणी करणे, ट्रॅक्टरवर मशागतीची कामे करणे, पशुधनाचा सांभाळ करणे यासाठी सालगडी अत्यंत गरजेचा असतो. त्यामुळे या बागायतदार शेतकर्‍यांकडून दरवर्षी नवा सालगडी कामासाठी ठेवण्यात येतो. बड्या शेतकर्‍यांबरोबरच बांधावरील शेतकर्‍यांकडूनही अर्थात बाहेरगावी नोकरीस असणारे पण गावी शेती असणारे चाकरमणी आपल्या शेतात सालगडी ठेवतात. या उतार्‍यावरील शेतकर्‍यांची शेती तर पूर्णतः सालगड्यांच्या भरवशावरचं असते. त्यामुळे त्यांना अधिक दाम देऊनच सालगडी शेतीकामासाठी ठेवावा लागत असल्याचे पहायला मिळत आहे.

सन 2000 पर्यंत ग्रामीण भागात सालगडी रास्त दरात शेतकर्‍यांना उपलब्ध होत होते. मात्र, गेल्या 20 वर्षांपासून दरवर्षी शेतकर्‍यांना सालगडी शोधून त्याला वार्षिक मोबदला ठरविणे अत्यंत आव्हानाचे ठरत असल्याने शेतकर्‍यांसाठी सालगडी ही बाब दुर्मिळ ठरत आहे.

यंदा 25 मार्च रोजी गुढीपाडवा सण आहे. गुढीपाडवा म्हणजेच शेतकर्‍यांसाठी नवे वर्ष असते. या दिवसापासून शेतकरी शेतीच्या नव्या दिवसाची सुरुवात करतो. शासकीय व कंपनी स्तरावर दरवर्षी जसे 1 एप्रिल ते 31 मार्च असा वार्षिक कालावधी असतो. तसाच कालावधी शेतकर्‍यांसाठी गुढीपाडव्यापासून नव्या वर्षाचा आरंभ करण्यात येतो. यादिवशी शेतकरी शेतीसह पंचक्रोशीतील देव-देवता व घराण्यातील दिवंगत पूर्वजांच्या समाधीचे विधीवत पूजन करतो. यादिवशी शेतकरी कुटुंबासह सालगड्यालाही नवा पोषाख असतो. दुष्काळी परिस्थिती, अवेळी येणारा पाऊस, अतिवृष्टी यासारख्या असंख्य संकटांना सामोरे जात शेतकरी आजही जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. काही शेतकरी तर सालगड्याच्या अख्ख्या कुटुंबालाच वर्षभर आधार देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील सालगडी कुटुंबाचे जेमतेम का असेना पण निश्चित मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.

उचल घेऊन फरार होण्याचे प्रकार वाढले

ग्रामीण भागात गुढीपाडव्यापासून सालगडी म्हणून शेतकर्‍यांच्या शेतात राहिलेल्यांना 40 ते 50 टक्के रक्कम सुरुवातीला शेतकर्‍यांकडून उचल म्हणून देण्यात येते. प्रत्येक गावात सालगडी मिळणे मुश्किल असल्याने काही शेतकरी बाहेरच्या गावातील सालगडी हेरुन त्याची नेमणूक करीत आहेत. मात्र, बाहेर गावचे काही सालगडी उचल रक्कम घेऊन शेतकर्‍यांच्या हाती कायमची तूरी देऊन फरार होत असल्याच्याही घटना अलीकडच्या काही वर्षांत घडत आहेत. त्यामुळे हा प्रकार शेतकर्‍यांसाठी चांगलाच डोकेदुखीचा बनला आहे.

राहण्याची, भोजनाची होतेय सोय

सालगडी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बहुतेक बागायतदार शेतकरी सालगड्याच्या रोजच्या भोजनाची व राहण्याची व्यवस्था वर्षभर करतात. काही शेतकरी तर सालगड्याच्या कुटुंबासाठीच शेतात राहण्याची व्यवस्था करतात. कुटुंबातील सर्व व्यक्तींना या शेतातच वर्षभर रोजगार मिळतो. त्यामुळे सालगडी कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो. कुटुंबासाठी आवश्यक असलेला भाजीपाला व धान्यही शेतकर्‍यांच्या शेतातून मिळत असल्याने कमी खर्चात सालगडी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, अलीकडील काळात सालगडी म्हणून काम करणार्‍यांची संख्याच कमी झाल्याने शेतकर्‍यांसाठी सालगडी शोधण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.

बिहारी सालगड्यांची मोठी चलती

सोलापूर जिल्ह्यात सालगडी मिळणे मुश्किल झाल्याने आणि वार्षिक दरही वाढल्याने बागायतदार शेतकर्‍यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे पंढरपूर, मोहोळ, माळशिरस, दक्षिण सोलापूर व माढा तालुक्यातील सुपिक नदीकाठचा बागायतदार शेतकरी चक्क बिहारी सालगडी आणत आहेत. अत्यंत रास्त दरात व अत्यंत कष्ट करणारे मजूर बिहारमधून मिळत असल्याने बहुतेक बागायतदारांच्या शेतात आता बिहारी बाबूंनी जागा घेतली असल्याचे दिसून येत आहे. बिहारी सालगडी कामासाठी दणकट असला तरी तो आपल्या शेतातून कधी जाईल, याची भिती मात्र अनेक शेतकर्‍यांना लागलेली असते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
दिलासादायक: समृद्ध जीवन गुंतवणूकदारांना पैसे मिळणार परत

दिलासादायक: समृद्ध जीवन गुंतवणूकदारांना पैसे मिळणार परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा