मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून तालुक्यातील सर्व मंगल कार्यालय , मठ हे लग्न व धार्मिक सोहळे तसेच विविध कार्यक्रमासाठी ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी संबधितांना दिल्या.
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या कार्यवाही बाबत सूचना देण्यासाठी नवीन भक्त निवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , प्रभारी आरोग्य अधिकारी तोडकर, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे , मंगल कार्यालय व मठाचे मालक , चालक , व्यवस्थापक आदी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी ढोले बोलताना म्हणाले , मंगल कार्यालय व मठामध्ये लग्नकार्य , मुंज , बारसे , स्नेह मेळावे आदींचे आयोजन करण्यात येते . या कार्यासाठी नातेवाईक , आप्तेष्टासह , ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात . कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करावेत यासाठी मंगल कार्यालय व मठ सर्व कार्यासाठी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत . कोणत्याही आफवेला बळी पडू नये , तसेच सामाजिक संस्था , राजकीय नेते माध्यम प्रतिनिधी , व्यापारी व नागरीकांनी यांनी कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जनजागृती करावी व प्रशासनास सहकार्य करावे , असे आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज