मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
कृषी व कृषिपूरक व्यवसायाशी निगडित सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (डचअठढ) प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात बुधवारी झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने (आयबीआरडी) सुमारे 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. दरम्यान, या प्रकल्पाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत संमत करण्यात आला.
स्मार्ट प्रकल्पांतर्गत कृषी मालाच्या पणनविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत एक हजार रुग्णालये
सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी सहाय्यभूत ठरणार्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. राज्यात आता प्रत्येक तालुक्यात किमान एक रुग्णालय योजनेत सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरात सहभागी रुग्णालयांची संख्या दुप्पट करुन सुमारे एक हजार रुग्णालयांचा समावेश योजनेंतर्गत केला जाईल. त्यामुळे अधिकाधिक रुग्णांना त्याचा फायदा होऊन दिलासा मिळेल, असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी व्यक्त केला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज