मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
शिरटी ता.शिरोळ येथील शिरटी हायस्कूल शिरटी मध्ये, इयत्ता 10 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीला पाण्यातून विषबाधा झाली होती. गेली पाच दिवस तिच्यावरती उपचार सुरु होते. आज मंगळवारी पहाटे उपचारा दरम्यान तिचा मृत्यु झाला. सानिका नामदेव माळी वय 16 वर्षे असे मयत झालेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. दरम्यान सानिकाच्या नातेवाईकांनी तिच्या मृत्यूला जबाबदार असणार्यांवर कारवाई करावी या मागणीकरीता पाच तास मृतदेह शाळेच्या दारात ठेवल्याने, शिरटीमध्ये तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी 20 फेब्रुवारी रोजी सानिका माळी ही शाळेच्या, प्रयोगशाळेच्या खोलीमध्ये सानिका 10 वी ची प्रॅक्टीकल परीक्षा देण्याकरीता आली होती.परीक्षा झाल्यानंतर तिने पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमधील पाणी पिल्या नंतर काही क्षणातच तिला अस्वस्थ वाटू लागले. तसेच काही क्षणात ती बेशुध्द पडली. आईवडीलांनी तिला उपचाराकरीता शिरोळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. शिरोळमध्ये उपचार सुरु असताना तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने, पुढील उपचाराकरीता कोल्हापुरच्या खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज