मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मुंबई-बंगलोर महामार्गावरील वारजे ब्रीजजवळ ही घटना घडली. उमेश हरिश्चंद्र क्षीरसागर (वय ३९, रा.पाषाण) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भूषण क्षीरसागर यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास उमेश, दीपक आणि शुभ्रा तिघेजण दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी चांदणी चौकाकडे जात असताना वारजे ब्रीजजवळ एका अज्ञात मोटार चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामुळे तिघेही खाली कोसळले.यात उमेश याना गंभीररित्या मार लागला
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज