मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोशल डिस्टन्स महत्त्वाचं आहे, देशात ९० टक्के लोक सूचनांचं पालन करत आहेत मात्र १० टक्के लोक नियम पायदळी तुडवत आहेत, लोकांनी सूचनांचं पालन करा आणि पोलिसांनी सहकार्य करा असा आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
निजामुद्दीन सारखा कार्यक्रम राज्यात टाळला पाहिजे, निजामुद्दीनमध्ये जे काही झालं त्याची मोठी किमत चुकवावी लागणार आहे. तसा प्रकार इथे घडू नये याची खबरदारी प्रत्येकांनी घ्या असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे, व्हिडिओद्वारे पवारांनी जनतेशी संवाद साधला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज