मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील खेळाडूंना क्रीडा विभागाकडून अद्याप प्रमाणपत्रे मिळाली नसल्याने खेळाडू, क्रीडा शिक्षक आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. परंतू, आता ही प्रतीक्षा संपली असून, येत्या दोन दिवसात सर्व गुणवंत खेळाडूंना त्यांच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडाधिकारी आणि महापालिका क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
सालाबादप्रमाणे याहीवर्षी क्रीडा कार्यालयाचे वतीने विविध शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा कार्यालयातर्फे दरवर्षी प्रमाणपत्र मिळत होते. परंतु अद्याप यावर्षीची प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत.
दरम्यान, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांनी जिल्ह्याचे आणि विभागाचे प्रमाणपत्र हे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, कुमठा नाका सोलापूर येथून घ्यावे. सोलापूर शहरातील प्रमाणपत्र महानगरपालिका क्रीडा कार्यालय पार्क मैदान येथून घ्यावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा क्रीडा शारीरिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज