मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण येथील एका १७ वर्षीय दलित मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच गावातील वर्धमान जैनविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , वर्धमान महावीर जैन याने १६ जुलै रोजी दुपारी १२ . ३० च्या सुमारास नर्मदा पार्क मंगळवेढा येथे मोटार सायकलवरून येवून गाडी थांबवून मला सोडून कुठे चालली आहेस , माझ्यासोबत चल म्हणून तीच्या संमतीशिवाय तीचा हात पकडून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
याची फिर्याद त्या मुलीने दिल्यानंतर पोलिसांनी वर्धमान जैन विरूध्द भा . दं . वि . सं . कलम ३५४ ( अ ) ( १ ) , बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ८ , १२ , अनुसूचित जाती जमाती अधिनियम ३ ( २ ) ( व्ही ए ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज