मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । दुचाकीवरून गावात आलेल्या 36 वर्षीय तरुणाला समोरून येणार्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना वाफळे तालुका मोहोळ येथे दिनांक 13 मार्च रोजी घडली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश अंकुश झोडे हे एच. एफ. डिलक्स मोटार सायकल क्र. एम एच 13/ सी.एन.7644 वरून दि.13 रोजी सायंकाळी 7.15 वा.चे सुमारास घरामध्ये काही किराणा सामान लागणार असल्याने वाकळे गावामध्ये आले होते.
अनगर ते वाफळे जाणारे डांबरी रोडने माणीक मुसळे यांचे घरा जवळून जात असताना, वाफळेकडुन अनगर रोडने येणारे तानाजी आहेर यांच्या महिन्द्रा 775 डी.आय ट्रॅक्टरने नागेश झोडे यांच्या दुचाकीला भरधाव वेगात येऊन धडक दिली. त्यामध्ये झोडे यांना गंभीर मार लागल्याने त्यांना मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या अपघातप्रकरणी ट्रॅक्टर चालक तानाजी आहेर रा.वाफळे याच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार नागराज निंबाळे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज