मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । संचारबंदीच्या काळात गोणेवाडी येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या बाळू सलगर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून १२ हजार ४१२ रुपयांचा अवैध दारू साठा जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, २५ मार्च रोजी दुपारी ३ च्या सुमारास गोणेवाडी ते नंदेश्वर जाणाऱ्या रोडच्या दक्षिण बाजूस बाळ आनंदा सलगर हा त्याच्या घरात विना परवाना बिगर पास परमीटने बेकायदेशीररित्या जवळ बाळगला व पोलिसांची चाहूल लागताच तो माल घरातच सोडून पळून गेला. पोलिसांनी या ठिकाणाहून देशी व विदेशी दारूच्या एकूण १२ हजार ४१२ रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या.याची फिर्याद पो. कॉ .अजित मिसाळ यांनी दिली असून बाळू सलगर विरूध्द महाराष्ट्र प्रोव्हिबिशन कायदा कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.ना येलपले हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज