मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-
दरीबडची (ता. जत) येथे ट्रॅक्टरच्या धडकेत सदा गेनू ऐवळे (वय 70) यांचा चाकाखाली सापडून मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी झाला. जत पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदा ऐवळे घरी जात होते. बिगर नंबर प्लेटचा ट्रॅक्टर अक्षय सुरेश माळी खत भरण्यासाठी घेऊन जात होता. ऐवळे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी त्यांना ट्रॅक्टरची धडक बसली. ऐवळे यांचा ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला.
पोलिस ठाण्यात पांडुरंग ऐवळे यांनी फिर्याद दिली आहे. तपास पोलिस हवालदार प्रशांत गुरव करीत आहेत. सदा ऐवळे हे गावामध्ये देवाच्या पालखीसमोर दिवटी पेटविण्याचे काम करीत होते.
ते भूमिहीन होते. नातेवाईक कोणीच नसल्याने निराधार योजनेतून पेन्शन मिळत होता. त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज