मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
देगाव, ता. सातारा येथे तालुका पोलिस ठाण्याचा गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पथक (डीबी) पेट्रोलिंग करत असताना तीन संशयास्पद हालचली करणारे युवक आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी तीन दुचाकी चोरल्यांची कबुली दिली.
सर्व संशयित कोरेगाव तालुक्यातील आहेत. यातील काही संशयित कॉलेजकुमार असून मौजमजा करण्यासाठी चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली आहे. आकाश हिंदुराव आवळे (वय 19), अभिजीत बाळकृष्ण सावंत (वय 19), ओंकार शिवाजी खरात (वय 19 तिघे रा.आर्वी ता.कोरेगाव) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, डीबीचे पथक देगाव येथे गस्त घालत होते.
दरम्यान, संशयित कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत.पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोनि सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, सागर निकम, संदीप कुंभार, रमेश चव्हाण, नितीराज थोरात यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज