मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी जिल्हा प्रशासनाने काढलेली विशेष सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीने व्हिप बजावल्यानंतरही बंडखोर सदस्यांनी केलेले मतदान अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत ग्राह्य धरल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे गटनेते बळिराम साठे यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती.
या तक्रारीवर शुक्रवारी सुनावणी झाली. म्हणणे व कागदपत्रे सादर करण्यासाठी पुढील तारीख मागण्यात आली आहे. त्यानुसार १८ मार्च रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीबाबतची सोलापूरचे जिल्हाधिकारी यांचेकडील कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे पुढील मुदत मागण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज