mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आईचा खून करणाऱ्या नराधम मुलास जन्मठेप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
आईचा खून करणाऱ्या नराधम मुलास जन्मठेप


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । आईचा खून केल्याबद्दल किरण रायाप्पा बंडगे (वय 25, रा. बाज, ता. जत) याला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद रामराव देशमुख यांनी काम पाहिले.

खटल्याची पार्श्‍वभूमी अशी, रायाप्पा विठोबा बंडगे, पत्नी नंदाबाई, आई वैजयंता, मुले शरद, मोहन व किरण, मोठी सून कमल, नात अमृता, नातू अदित्य असे सर्वजण मिळून बाज येथे राहत होते. रायाप्पाचा मोठा मुलगा शरद त्यांची पत्नी कमल व नातू अदित्य हे ऊस तोड कामासाठी कवठेपिरान येथे गेले होते. दुसरा मुलगा मोहन हा ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून बाज येथे कामाला जात होता.

तर किरण हा काहीही काम करीत नव्हता.

किरण लहानपणापासून रागीट व भांडखोर स्वभावाचा होता. त्याला कोणीही सांगितलेले पटत नव्हते. बर्‍याच वेळा तो सांगणार्‍या व्यक्‍तीस मारत असे. जानेवारी 2016 मध्ये एके दिवशी सायंकाळी 5 वाजता आई किरणला म्हणाली की, ‘ऐवढा मोठा झालास तुला कळत नाही का? टॉवेलने हात-पाय पुसायचे सोडून परकरने हात-पाय पुसतोस काय’ यावर किरण संतापला होता.

रात्री 10.30 दरम्यान घरातील सर्वजण झोपी गेल्यानंतर किरणने घरातील विळ्याने आई नंदाबाई हिच्या पाठीवर, मनगटावर व छातीवर वार केले. त्यावेळी किरणची आजी वैजयंता जागी झाली. तिने आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे वडील रायाप्पा हे देखील जागे झाले. त्यावेळी किरणच्या हातात रक्‍ताने माखलेला विळा होता. तर नंदाबाई या रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. ‘तू हे काय केलेस’ अशी विचारणा रायाप्पांने मुलगा किरण यास केली. त्यावेळी किरण म्हणाला ‘म्हातार्‍या तुलापण आता जिवंत सोडत नाही’ किरणने वडिलांच्या मानेवर वार केला. दुसरा वार करणार तेवढ्यात मुठीतून विळा निखळून खाली पडला. त्यानंतर रायाप्पा आरडाओरडा करीत घराबाहेर पडले. त्यांच्या आवाजामुळे शेजारचे लोक जमा झाले.

शेजारील लोक घरात गेले असता किरण व त्याची आजी वैजयंता यांच्यात झटापट सुरू होती. किरण कुर्‍हाड घेऊन वैजयंताच्या मागे धावत होता. लोकांना पाहून किरण तेथून पळून गेला. शेजारील लोकांनी रायाप्पा व वैजयंता यांना जत येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आई नंदाबाई हिचा जागीच मृत्यू झाला होता. रायाप्पा यांनी पोलिसात फिर्याद दिली.

पोलिसांनी किरण विरूध्द खून व खुनाचा प्रयत्न याबद्दल गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक सोनवलकर यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. आजी वैजयंता यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

न्यायालयाने किरण बंडगे याला आईच्या खुनाबद्दल भा.द.वि.कलम 302 अन्वये जन्मठेप तसेच वडील आणि आजी यांच्यावर खुनीहल्‍ला केल्याबद्दल भा.द.वि.कलम 307 अन्वये तीन वर्षे सक्‍तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. दंड न भरल्यास प्रत्येक कलमास एक वर्ष जादा सक्‍तमजुरीची शिक्षा भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापुरात कोरोनाचा रूग्ण असल्याची सोशल मीडियावर चर्चा

सोलापुरात कोरोनाचा रूग्ण असल्याची सोशल मीडियावर चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 10, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

February 9, 2026
गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

February 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा