मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
टीव्ही आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे शाळकरी मुलांमधील दृष्टिदोषाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली.
या योजनेवर सुमारे २५ कोटी रुपये खर्च आहे.सध्या केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत शालेय मुलांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येते. या विद्यार्थ्यांची एक हजार १९५ वैद्यकीय पथकांमार्फत तपासणी केली तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोषाचे प्रमाण वाढलेले आढळले आहे.
या शाळांमध्ये एक कोटी २१ लाख ६७ हजार ५८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . त्यापैकी आठ टक्के विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोष असल्याचे आढळले. त्यामुळे दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे उपलब्ध करून देण्याच येणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज