मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
शाळा सुटल्यानंतर तिघे मित्र शेतातील तळ्यात पोहण्यासाठी गेले . परंतु मनाई यापैकी एका विद्यार्थ्यास पोहता येत शेततळ्यात नसल्यामुळे त्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.
ही घटना १२ फेब्रुवारी रोजी टाकळी येथे दुपारी घडली . कोर्टी ( ता . पंढरपूर ) येथील परंतु शांतीनिकेतन गुरुकुल विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी कुबेर देठे ( रा .बुडून मृत्यू टाकळी ) , अनुज शिंदे ( रा . श्रीनगरी , पंढरपूर ) व मुबीन नदाफ ( रा . जुना कराड नाका , पंढरपूर ) हे तिघे शाळा सुटल्यानंतर टाकळी येथील देठे यांच्या शेतातील शेततळ्यात पोहण्यास गेले.
तिघांपैकी मुबीन नदाफ यास पोहायला येत नव्हते . मित्रांनी त्याला मनाई करुनही तो पोहण्यासाठी शेततळ्यात उतरला व पोहत असतानाच शेततळ्यात बुडून त्याचा मृत्यू झाला . मित्रांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले . परंतु ते अपयशी ठरले . घटना समजताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज