मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी भाजपात जाहिर प्रवेश केला आहे.या वरून आता महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजप विरूद्ध महाविकास आघाडीत चांगलीच टोलेबाजी सुरू आहे.मध्य प्रदेशातील राजकीय परिस्थितीचा दाखला देत एक ना एक दिवस चूक होईल, कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे महाराष्ट्रातही येईल असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत बोलतांना लगावला होता.
आता यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.तुम्ही कितीही म्हटले चुकी झाली,तरी पण आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणतो चुकीला माफी नाही.इकडचा कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही.तिकडचाच कोणी होईल याची काळजी घ्या.आज बरेच जण गैरहजर आहेत.त्यामुळे,तुमच्या आमदारांवर लक्ष ठेवा.मी काही लपून करत नाही, समोर करतो आणि तिथेही केलं आणि इथेही आलो आणि मजबूत बसलो आहे,असाही टोला अजित पवारांनी भाजपला लगावला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज