mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

युटोपियन शुगर्स ची हार्वेस्टिंग क्षेत्रात नाविण्यपूर्ण कामगिरी.

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
युटोपियन शुगर्स ची हार्वेस्टिंग क्षेत्रात नाविण्यपूर्ण कामगिरी.

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे ऊसाची कमतरता निर्माण झाल्याने साखर कारखान्यांना विविध आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक साखर कारखाने असणार्‍या सोलापूर जिल्ह्यात केवळ ५ ते ६ कारखाने पूर्ण क्षमतेने चालत आहेत तर काही कारखाने कमी क्षमतेने व उर्वरित साखर कारखाने बंद स्थितीत आहेत.

ऊसाच्या कमतरते बरोबरच जिल्ह्यात ऊस तोडणी यंत्रणेची कमतरता ही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. नेहमीच नाविण्याचा शोध घेत अनोखी यंत्रणा उभारणी मध्ये अग्रेसर असणार्‍या  युटोपियन शुगर्स या कारखान्याने मात्र या वरती पर्याय शोधून काढला असल्याची माहिती कारखान्याचे अभ्यासू व कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी दिली .

     नविन तंत्रज्ञाना विषयी माहिती देताना पाटील म्हणाले की, ऊसतोड कामगारांची कमतरता सध्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच ज्या कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे असे कारखाने हार्वेस्टिंग मशीन चा वापर करीत आहेत. मात्र हार्वेस्टिंग मशीन वापरणे व हार्वेस्टिंग मशीन च्या सहाय्याने तोडणी केलेला ऊस गव्हाणी मध्ये खाली करणे यासाठी टेपलरचा वापर करतात. या साठी आनुषंगिक खर्च ५० लाख रुपया पर्यन्त येतो. व एक वाहन खाली करण्यासाठी साधारणपणे अर्धा तास ईतका कालावधी लागतो.तसेच मेंटेनन्स खर्च ही जास्तीचा येतो. यावर पर्याय काढण्यासाठी युटोपियन शुगर्स चे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील व मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे,  ॲग्रोटेक सेल्स चे श्री अनिल पाटील हे सर्वजण अभ्यास करीत होते. व या सर्वांच्या अभ्यासातून नायलॉन जाळीचा वापर करून ऊस खाली करण्यास सुरुवात केली.या करिता येणारा खर्च ही खूप नगण्य आहे.व कारखान्याला त्यांच्याकडे असणार्‍या प्रचलित यंत्रणेमध्ये कोणताही बदल करावा लागत नाही.तसेच इतर वाहनांप्रमाणेच वेळेत वाहन खाली होत आहे.कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा कारखान्यावर न पडता हा पर्याय निघाला आहे. यासाठी ट्रॅक्टर ,डंपिंग ची ही आवश्यकता नाही. तसेच नायलॉन जाळी बाबत ५ ते १० वर्षाची खात्री मिळाली आहे. या नाविण्यपूर्ण संकल्पनेमुळे कमीत कमी खर्चात ही सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे वाहन मालकांचा ही वेळ वाचत असल्यामुळे त्यांनीही या बाबत समाधान व्यक्त केले आहे.

अशा प्रकारचा प्रयोग करणारा युटोपियन शुगर्स हा जिल्ह्यातील पहिलाच साखर कारखाना असून या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी परिसरातील इतर कारखान्याचे अधिकारी भेट घेत असल्याची माहिती कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी दिली.    

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यातील तरुणाची प्रेमसंबंधातून आत्महत्या पोलीस तपासात माहिती उघड

मंगळवेढ्यातील तरुणाची प्रेमसंबंधातून आत्महत्या पोलीस तपासात माहिती उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकर सावधान! घरगुती गॅस सिलेंडर वापरताना ‘ही’ चूक पडेल महागात; व्यावसायिक वापर आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

March 14, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळजनक! मंगळवेढ्यात माजी उपसरपंचावर जीवघेणा हल्ला; लोखंडी साखळी अन् केबलने बेदम मारहाण, मोबाईलही लुटला

March 14, 2026
मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

March 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू; वर्गातील सवंगड्यांसोबत गेला असताना घडली घटना

March 13, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा