मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
झेडपी प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली टप्पा क्र . ४ मधील ऑनलाईन बदलीप्रक्रियेत नातेवाईकांचा गंभीर आजार प्राधान्यक्रमाची सुविधा ऑनलाईन प्रक्रियेत समाविष्ट नसल्याची तक्रार सांगोला तालुक्यातील पाचेगावच्या शिक्षिका पूनम चव्हाण यांनी मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्याकडे केली आहे .
प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया | ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे . शासनाच्या अद्यादेशानुसार घरातील वयोवृद्धांच्या गंभीर आजाराच्या देखभालीसाठी शिक्षकांना जवळच्या होत ठिकाणी बदली मागता येते . त्यानुसार विक्रीसाठी चव्हाण यांचे सासू सासरे आजारी असल्याने मळगावी म्हणजे जळगाव जिल्हा परिषदेकडे बदली हवी आहे .
पण या आनॅलाईन प्रक्रियेत टप्पा क्र ४ मध्ये विशेष संवर्ग १ मधून प्राधान्यक्रम १२ व १३ चा समावेशच केलेला नाही . त्यामुळे या सर्वगति अज करणा – या शिक्षकांची अडचण झाली आहे . त्यामळे ऑनलाईन प्रक्रियेत या पर्यायाचा समावेश करण्याबाबता शिक्षण तातडीने कळवावे अशी विनंती चव्हाण यांनी केली आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज