मंगळवेढा : समाधान फुगारे
मंगळवेढा-पंढरपुर विधानसभा मतदारसंघांमध्ये आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आमदार भारत भालके,अपक्ष उमेदवार समाधान आवताडे,रयत क्रांतीचे सुधाकरपंत परिचारक व काँग्रेसचे शिवाजीराव काळुंगे हे आज पासून प्रचाराचा झंझावात सुरू करणार आहेत.
दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर हे राजकीय मंडळी प्रचाराचा नारळ फोडून जनतेसमोर जाणार आहेत.युतीच्या बंडखोर शैला गोडसे, वंचित आघाडीचे बंडखोर अनिल बोदाडे, संघर्ष सेनेचे सतिश पाटील आदिंनी आपले अर्ज परत घेतले आहेत.
आता महायुतीचे सुधाकरपंत रामचंद्र परिचारक, युतीचे बंडखोर समाधान महादेव आवताडे, काँग्रेसचे प्रा.शिवाजीराव बाजीराव काळुंगे, राष्ट्रवादीचे भारत तुकाराम भालके हे प्रमुख रिंगणात आहेत.21 ऑक्टोबर रोजी मतदान, 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी व काँग्रेसची केंद्रात व राज्यात आघाडी आहे मात्र आघाडीचे नेते आता कोणाच्या प्रचारात दिसणार तसेच माघार घेतलेले बंडखोर अथवा अपक्ष कोणत्या उमेदवाराच्या व्यासपीठावर दिसणार? याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज