मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
नियोजनात्मक पद्धतीने चालू असलेल्या सांगोला तालुका समन्यायी पाणी वाटपाची नियोजित बैठक सांगली येथील जपलसंपदा विभागाच्या कार्यालयात पार पडली . यावेळी डॉ . भारत पाटणकर यांनी आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीत सांगोला तालुका समन्यायीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला , सोबतच आटपाडी व तासगाव तालुक्यांच्या समन्यायीच्या कामाचा आढावा घेण्यात आला .
कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी कार्यकारी अभियंता हरगुडे , कार्यकारी अभियंता पाटील व कार्यकारी अभियंता चिले उपस्थित होते . यावेळी तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव , जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचे गुंड , सरगर , उजनी विभागाचे सुरणीस , कुंभार उपस्थित होते .
विविध विभागाची माहिती कार्यकारी अभियंत्यांना हस्तांतरित करण्यात आली असून फक्त सांगोला तहसील कार्यालयाकडून यावर स्पष्टीकरण देण्यासाठी कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते असे बैठकीची माहिती देताना सचिन पवार यांनी सांगितले . तालुक्यातील १०४ गावांना कसे आणि कुठल्या योजनेतून पाणी देता येईल , याचा ढोबळ आराखडा सादर केला .
संबंधित वितरण व्यवस्था उभारताना आणखी काही गोष्टींचा अभ्यास होणे बाकी आहे . आतापर्यंत झालेल्या प्रगतीविषयी डॉक्टर भारत पाटणकर यांनी समाधान व्यक्त केले बैठकीमध्ये सहभागी झालेल्या शिष्टमंडळांमध्ये गणेश बाबर , माजी सैनिक शिवाजी बाबर , भागवत बाबर , राहुल बाबर , किरण बाबर , विकास बाबर यांचा समावेश होता .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज