मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
कृषी उत्पन्न बाजार समितीत ६ डिसेंबर रोजी ६७० क्विंटल कांद्याची आवक झाली होती . जास्तीत जास्त ९ हजार ५०० रुपये विक्रमी दर मिळाला होता . २५ जानेवारी रोजी ६२५ क्विंटल आवक झाली . दर मात्र , सहा हजार रुपयांनी पडले व ३५०० रुपये दराने कांदा विक्री झाल्याची नोंद समिती प्रशासनाने घेतली आहे .
२८ सप्टेंबर रोजी जाधववाडी कृषी उत्पन्न बाजारात १ हजार ८० क्विंटल कांद्याची आवक झाली होती . १२०० ते ३७०० रुपये ठोक दर मिळाला होता . किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये दराने विक्री झाला होता . ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये कांद्याच्या दरात वाढ होत गेली . डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचा भाव खूपच वाढला . ५ डिसेंबर रोजी ७३९ क्विंटल आवक झाली . डिसेंबरमध्ये कांदा महागच होता .
५ डिसेंबर रोजी ७३९ क्विंटल आवक झाली . १ हजार ते ८५०० रुपये भाव मिळाला . जानेवारीत स्थानिक ते अफगाणिस्तान येथील नवा कांदा बाजारात दाखल झाला व मागणी व पुरवठा याचे संतुलन होऊन भाव पडण्यास सुरुवात झाले . ग्राहकांना कांद्याने रडवेल तेवढीच आवक सध्या होत आहे . दरात मात्र , सहा हजारांनी घसरण झाली आहे . शेवग्याला मिळतोय विक्रमी भाव : शेवगा शेंग ३ क्विंटल आवक झाली व कमीत कमी ७ हजार व जास्तीत जास्त ९ हजार रुपये क्विंटल भाव मिळाला .
यामुळे उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे . किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलो दराने शेवगा विक्री होत आहे . कोथिंबीर १०० ते २०० रुपये शेकडा , पालक २०० ते ४०० रुपये आणि मेथी ३०० ते ४००रुपये , टोमॅटो २५०० ते ५५० रुपये कॅरेटप्रमाणे विक्री होत आहे . हमी भावाला केराची टोपली : बाजरीला १५०० ते १६०० , ज्वारीस २ हजार ते २१०० , मका १४०० ते १६०० रुपये , तर ४ हजार ते ४७७० , सोयाबीन ३३०० ते ४ हजार रुपये दरम्यान दर मिळाला . तूर , सोयाबीन , मका , बाजरीला हमीभावा पेक्षा कमी दर मिळाला . यामुळे उत्पादक प्रचंड नाराज झाले आहेत . आडत व्यापारी केंद्र , राज्य सरकारचा नियम डावलला जात आहे . यात समिती बघ्याची भूमिका घेत आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज