मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सातारा येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयामधील पोलिस निरीक्षक नितीन माने यांच्याविरुद्ध मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी त्याच कार्यालयामधील पोलिस कर्मचारी राम कोळी यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस अधिकाऱ्याने विटाने मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
ही घटना दिनांक ११ रोजी जात पडताळणी कार्यालय आणि रस्त्यावर ही घटना घडली आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक हे मूळचे रहिमतपूर येथील असून सध्या सातारा जात पडताळणी कार्यालय येथे नियुक्ती आहे. दरम्यान, मारहाण, दमदाटी, शिवीगाळ केली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज