मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत इंदिरा गांधी स्टेडीयम , सिध्देश्वर मंदिर परिसर सुधारणा कामांचा शुभारंभ आणि कुमठा जाका येथिल कुष्ठरोग वसाहतचे उद्घाटन सोहळा शुक्रवारी खा . डॉ . जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या हस्ते करणार येणार असल्याची माहिती महापौर श्रीकांचना यलम यांनी पत्रकार परिषदेत दिली .
शुक्रवारी सकाळी १० ते ११ यावेळत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .
यावेळी महापौर श्रीकांचजा यलम , आ . रामहरी रुपनवर , दत्तात्रय सावंत , प्रशांत परिचारक , सुभाष देशमुख , आ . विजयकुमार देशमुख आयुक्त दिपक तावरे आदी उपस्तिय होणार आहे . स्मार्ट सिटी योजने अंतर्गत इंदिरा गांधी स्टेडीयम येथे नुतनीकरण व पुर्नविकास करणे ( फेज १ ) अंतर्गत विकास केला जाणार आहे , क्रिकेट , खोखो , बॅडमिंटन , कबडडी तसेच स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा करण्यात येणार आहे .
या कामाकरिता सुमारे २० कोटी निधीची तरतूद आहे , सिध्देश्वर मंदिर परिसरातील १ . ६ कि . मी . सुशोभित व विकसित करण्यात येणार आहेत . एकूण १३ कोटी ८३ लाखांची कामे केली जाणार आहेत . पंडित दिन दयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजिविका अभियानांतर्गत कुष्ठरोग्यांना व बेघरांना निवारा देण्याकामी त्या इमारतीमध्ये उद्याटन केले जाणार आहे . एकूण ७६ बेड असून त्यामध्ये किचन , डायनिंग , ऑफिस , स्टोअर , विजापूरनाका शौचालय ब्लॉक आदींचा समावेश आहे . या पत्रकार परिषदेस उपमहापौर राजेश काळे सभागृहनेते श्रीनिवास करली , उपस्थित होते .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज