मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
महेंद्रसिंह धोनी आपले बहुप्रतिक्षित पुनरागमन इंडियन प्रीमियर लीगमधून करणार असून त्याच्या पूर्वतयारीसाठी २ मार्चपासून तो प्रशिक्षणाला सुरुवात करणार आहे .
गतवर्षी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघ पराभूत झाला , तेव्हापासून ३८ वर्षीय धोनी क्रिकेटपासून दूर आहे . भारताला आतापर्यंत दोन विश्वचषक जिंकून देणारा आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आगामी २ मार्चपासून एम . ए . चिदंबरम स्टेडियममध्ये आपल्या चेन्नई संघातील काही इतर खेळाडूंसमवेत सरावाला सुरुवात करणार आहे .
१९ मार्चपासून संपूर्ण सीएसके संघ प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार आहे , असे सीएसकेचे सीईओ के . एस . विश्वनाथन यांनी सांगितले . २९ मार्च रोजी मुंबईत चेनई सुपर किंग्ज आणि गतविजेत मुंबई इंडियन्स यांच्यात उद्घाटनीय सामना खेळला जाणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज