मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांनी पुणे महसूल विभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी सोलापूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीपराव चव्हाण पंचायत समिती माजी सभापती प्रदीप खांडेकर तज्ञ संचालक सत्यजित सुरवसे जनार्दन कोंडुभैरी उपस्थित होते.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 29 फेब्रुवारी रोजी होणार असून या निवडणुकीसाठी 24 जानेवारीपासून 29 जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आहे तर 15 फेब्रुवारीला चिन्हांचे वाटप होणार आहे मतमोजणी 2 मार्च रोजी होणार आहे या निवडणुकीत शेतकरी प्रतिनिधी असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मतदान करणार आहेत पुणे विभागातील 40 बाजार समित्यांचे 601मतदार मतदान करणार आहेत.
सभापती सोमनाथ आवताडे यांनी पुणे विभागातून अर्ज दाखल केला असल्याने जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज