mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

प्रेमात अडसर होत होती म्हणून केली एकाची निर्घृण हत्या; पाचजणांना अटक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
प्रेमात अडसर होत होती म्हणून केली एकाची निर्घृण हत्या; पाचजणांना अटक

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



प्रेमात अडसरा येत असल्याने मूळ झारखंड येथील एका तीसवर्षीय इसमाचा निर्घृण्ण खून करुन त्याचा मृतदेह गोव्यातील धारगळ येथील रेल्वे रुळावर टाकून देणाऱ्या पाचजणांना कोकण रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले. जैयलेश्वर खाडिया असे मयताचे नाव असून, सर्व संशयितही झारखंड राज्यातील आहेत. विक्रम उर्फ ताबडे खाडिया (२0) , सतीश खाडिया (१९), विपिन खाडिया ( १९) , संजय खाडीया (२0) व विनोद कुल्लू (२0) अशी संशयितांची नावे आहेत.

ते मूळ झारखंड राज्यातील गुमला जिल्हयातील रहिवाशी आहे.

२१ जानेवारी रोजी गोव्यातील धारगळ येथेच खुनाची ही घटना घडली होती. संशयितांवर भारतीय दंड संहितेच्या ३०२, २०१, ३४१ कलमांखाली कोकण रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपासासाठी त्यांना पेडणे येथील प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता, त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली. मृत जैयलेश्वर हा पेडणे तालुक्यातील धारगळ येथे एका इसमाकडे कामाला होता. हुर्राक गाळण्याचे तो काम करीत होता.

सदया हुर्राक हंगामा जवळ आल्याने दोन महिन्यापुर्वीच तो गोव्यात आला होता. तो एका महिलेसमवेत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होता. या महिलेला एक पंधरा वर्षीय मुलगी असून, तिच्या पहिल्या पतीपासून तीला ही मुलगी झाली होती. ती मुलगी झारखंड येथे रहात असून, तेथेच तिचे विक्रम खाडिया याच्याकडे सूत जमले होते. दोघांमध्ये प्रेम होते. मात्र, जैयलेश्वर याचा या प्रेमाला विरोध होता. विक्रम हा याच आठवडयात गोव्यात आला होता. आपल्या अन्य मित्रांबरोबर त्याने जैयलेश्वर याला राजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काहीही ऐकून घेत नव्हता, त्याचा या प्रेमप्रकरणाला कडाडून विरोध होता.

 मंगळवारी २१ रोजी रात्री संशयित व मयत जैयलेश्वर हे एका स्थानिक बारमध्ये दारु पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी संशयितांनी जैयलेश्वर याची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काहीही ऐकायला तयार नव्हता. उभयंतांमध्ये यावेळी कडाक्याचे भांडण झाले. नंतर संशयिंत जैयलेश्वर याला धारगळ रेल्वे रुळाजवळ घेउन गेले. तेथे त्याला मारहाण केल्यानंतर तिक्ष्ण हत्याराने त्याच्या डोक्यावर वार करण्यात आले. व नंतर त्याला रेल्वे रुळावर आणून संशयित घरी परतले. या रुळवरुन धावणाऱ्या रेल्वेखाली तो येईल. हा मृत्यू रेल्वे धडकेने झाला असे पोलिसांना वाटेल व आपले कुर्कम कुणालाही कळणार नाही म्हणून संशयिताने हे नाटय रचले होते असेही पोलीस तपासात आढळून आले आहे. मात्र संशयितांचा डाव यशस्वी होउ शकला नाही. रात्रीच्या गस्तीवरील रेल्वे गॅगमनला एक अज्ञात इसम रेल्वे रुळावर पडलेला असल्याचे दिसून आल्यानंतर त्याने लागलीच रेल्वे स्टेशन मास्तरला त्याची कल्पना दिली. नंतर १0८ अ‍ॅम्बुलन्स सेवेच्या मदतीने जैयलेश्वरला म्हापसा येथील आझिलो इस्पितळात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. शवचिकित्सा अहवालात हा मयताच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निदान झाल्यानंतर हा खुनाचाच प्रकार असल्याची पोलिसांना पक्की खात्री झाली होती.

कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे उपअधिक्षक सेमी तावारीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेरिफ जॅकीस, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण देसाई , पोलीस शिपाई निलेश सावंत, अमरदीप चौधरी, श्रीनिवास रेडडी, तेजस धुरी, प्रदीप गावकर, तानाजी राणे, विराज मलिक, प्रवीण राणे, समीर शेख या कोकण रेल्वे पोलीस ठाण्यावरी पोलिसांसह कुंकळळी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष नाईक यांचे एक पथक तयार करुन शोधकार्याला सुरुवात केली. नंतर सर्व संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यांनी आपल्या गुन्हयाची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या खून प्रकरणाचा तपास लावल्याबद्दल या पोलीस पथकांचे गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी सन्मान केला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
खुशखबर 8 वी पाससाठी भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये होणार भरती

खुशखबर 8 वी पाससाठी भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये होणार भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठा ट्विस्ट! सुप्रिया जगताप यांना भाजपची उमेदवारी, तेजस्विनी कदम यांनी बंडखोरी करत भरला अपक्ष अर्ज, समविचारी कडून सुनंदा आवताडे; तर माजी सभापती यांना उमेदवारी

मोठा ट्विस्ट! सुप्रिया जगताप यांना भाजपची उमेदवारी, तेजस्विनी कदम यांनी बंडखोरी करत भरला अपक्ष अर्ज, समविचारी कडून सुनंदा आवताडे; तर माजी सभापती यांना उमेदवारी

November 17, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

दुर्दैवी घटना! लेकीसोबत अखेरची भेटही होऊ शकली नाही; मुलीच्या घरी जाताना वाटेत मृत्यू आडवा आला, मंगळवेढा हळहळलं

November 17, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! कंपनीच्या कामाकरिता जात असताना मोटर सायकलचा अपघात होवून मंगळवेढ्यातील तरुण ठार

November 17, 2025
आता माघार नाही! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम आज उमेदवारी अर्ज भरणार; पक्षाने दिली तर ठीक, अन्यथा..? जनतेचा पाठिंबा वाढला

आता माघार नाही! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम आज उमेदवारी अर्ज भरणार; पक्षाने दिली तर ठीक, अन्यथा..? जनतेचा पाठिंबा वाढला

November 17, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्यात राजकीय हालचालींना वेग! नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ३७ अर्ज दाखल; नगराध्यक्षपदावरून गुप्त बैठका सुरू

November 16, 2025
विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

November 16, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा