मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पुणे जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये बनावट आदेश देऊन बोगस शिक्षकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. शिक्षणाधिकारी व संस्थाचालकांच्या संगनमताने बोगस भरती झालेले हे शिक्षक गेले अनेक वर्षे वेतन घेत आहेत, अशी कबूली शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. याप्रकरणी संबंधित अधिकारी, संस्थाचालक तसेच संबंधित शिक्षक अशा 28 जणांवर गुन्हा दाखल केल्याचे गायकवाड यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.
विधानसभेत खडकवासलाचे आमदार भिमराव तापकिर यांनी पुणे येथील खासगी अनुदानित शाळांमधील बोगस शिक्षकांच्या नेमणूकासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या लेखी उत्तरात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
शासनाची फसवणूक करून शिक्षकांची नेमणूक करून नियमबाह्यरित्या शिक्षक व तुकड्या मान्यतेचे आदेश देऊन झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशी करण्यात आली. या चौकशीत संबंधित अधिकारी, संस्थाचालक तसेच शिक्षक अशा 28 व्यक्तिंवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गायकवाड यांनी लेखी उत्तरात दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज